पंचायतमंत्री यांना मोबाईलवर संदेशद्वारे खंडणीची मागणी व धमकी देणाऱ्याची जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 08:46 PM2020-11-09T20:46:14+5:302020-11-09T20:47:45+5:30

Crime News : जयेश याने २५ हजार रुपयांची वैयक्तीत हमी देऊन त्याला जामीन मंजूर केल्याची माहीती पोलीसांनी शेवटी दिली.

Demand ransom and threatened the Panchayat Minister through a text message, that accused release on bail | पंचायतमंत्री यांना मोबाईलवर संदेशद्वारे खंडणीची मागणी व धमकी देणाऱ्याची जामिनावर सुटका

पंचायतमंत्री यांना मोबाईलवर संदेशद्वारे खंडणीची मागणी व धमकी देणाऱ्याची जामिनावर सुटका

Next
ठळक मुद्दे जयेश याला २५ हजार रुपयांची वैयक्तीक हमी देण्याबरोबरच पुढचे १५ दिवस वेर्णा पोलीस स्थानकावर हजेरी लावून पोलीसांना याप्रकरणात चौकशीसाठी सहकार्य करण्याची अट घालून जामीन मंजूर केली असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

वास्को : गोव्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांना मोबाईलवर संदेश पाठवून धमकी देत खंडणीची मागणी करण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या जयेश फडते याची अटी घालून न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला. जयेश याला २५ हजार रुपयांची वैयक्तीक हमी देण्याबरोबरच पुढचे १५ दिवस वेर्णा पोलीस स्थानकावर हजेरी लावून पोलीसांना याप्रकरणात चौकशीसाठी सहकार्य करण्याची अट घालून जामीन मंजूर केली असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.


मावीन गुदिन्हो यांना २ आॅक्टोबरपासून मोबाईलवर संदेशद्वारे धमकी व खंडणीची मागणी करण्याच्या प्रकाराला सुरवात झाली होती. मागच्या काळात गुदिन्हो यांना अशा प्रकारचे अनेक संदेश पाठवण्यात आले असून ७ नोव्हेंबर रोजी गुदिन्हो यांना धमकी देणारा शेवटचा संदेश मोबाईलवर आला होता. रविवारी (दि ८) रात्री ७.३० च्या सुमारास याप्रकरणात वेर्णा पोलीसांनी शिंदोळी, साकवाळ येथील जयेश फडते याला अटक केली. अटक केलेल्या जयेश याच्याबाजूने त्याच्या वकीलाने रविवारी न्यायाधीक्षासमोर जामीन अर्ज दाखल केला असता त्याची जामीन मान्य करण्यात आल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली. जयेश यांने याप्रकरणात पुढचे १५ दिवस वेर्णा पोलीस स्थानकावर हजेरी लावून याप्रकरणाच्या चौकशीत पोलीसांना सहकार्य करण्याचे बजावण्यात आले आहे. तसेच जयेश यांने २५ हजार रुपयांची वैयक्तीत हमी देऊन त्याला जामीन मंजूर केल्याची माहीती पोलीसांनी शेवटी दिली.

Web Title: Demand ransom and threatened the Panchayat Minister through a text message, that accused release on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.