सासरच्या व्यक्तींकडून कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 04:02 PM2019-04-03T16:02:28+5:302019-04-03T16:07:14+5:30

कर्ज फेडण्यासाठी तुझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, तरच तुला नांदवणार असा तगादा लावला

demands for ten lakh rupees to repay a loan to women | सासरच्या व्यक्तींकडून कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा

सासरच्या व्यक्तींकडून कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा

Next
ठळक मुद्देचिखलीत विवाहितेचा छळ : पतीसह सासूविरोधात गुन्हा

पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत सासऱ्यांनी विवाहितेचा छळ केला. २७ वर्षीय विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २) विवाहितेचा पती आणि सासूविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मोहन कांबळे आणि सासू चंद्रकला मोहन कांबळे (रा. मोरे वस्ती, चिखली) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २४ नोव्हेंबर २०१५ ते २ एप्रिल २०१९ दरम्यान विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. लग्न झाल्यापासून फिर्यादी महिलेचा पती महेश मोहन कांबळे आणि सासू चंद्रकला मोहन कांबळे यांच्याकडून सातत्याने मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या मुलीस जिवे मारण्याची धमकी देत कर्ज फेडण्यासाठी तुझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, तरच तुला नांदवणार असा तगादा लावला. फिर्यादी महिलेची नांदण्याची इच्छा असूनही त्यांना माहेरी पाठवून दिले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.     

Web Title: demands for ten lakh rupees to repay a loan to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.