डॉक्टरने प्रियकराचे गुप्तांग कापले म्हणून कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:22 PM2019-12-16T19:22:23+5:302019-12-16T19:25:05+5:30

ही घटना बंगळुरू येथे घडली होती.

Dentist women gets 10-year rigorous imprisonment for chops off boyfriends penis | डॉक्टरने प्रियकराचे गुप्तांग कापले म्हणून कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

डॉक्टरने प्रियकराचे गुप्तांग कापले म्हणून कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

Next
ठळक मुद्देमहिला डॉक्टरला दोषी ठरवत १० वर्षांची कारावासाची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे.या दोषी महिला डॉक्टरचे नाव सईदा अमीना नहीम असं आहे. सईदाला कोर्टाला दणका देत पीडित प्रियकराला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

बंगळुरू - ४२ वर्षीय दातांच्या महिला डॉक्टरला प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. ही घटना बंगळुरू येथे घडली होती. बंगळुरूतील कोरामंगला येथील सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टाने महिला डॉक्टरला दोषी ठरवत १० वर्षांची कारावासाची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या दोषी महिला डॉक्टरचे नाव सईदा अमीना नहीम असं आहे. 

सईदाला कोर्टाला दणका देत पीडित प्रियकराला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आरोपी ही मूळची गुरप्पाना पल्या येथील आहे. २९ नोव्हेंबर २००८ साली सईदाने तिच्या प्रियकराचे त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याने त्याचे गुप्तांग कापले होते. ११ डिसेंबरला न्या. विद्याधर शिरहट्टी यांनी सांगितले की, पीडित पुरुषाचे त्याचे लग्नानंतरचे आयुष्य उध्वस्त झाले असून त्याला मानसिक त्रासातून जावे लागले. पैशाने हे नुकसान भरून निघणारे नाही. तरीदेखील काही रक्कम नुकसान भरपाई म्हणून निश्चित करण्यात आली असून काही दंड आकारण्यात आला आहे. 

पीडित मिर अर्शद अलीला राज्याच्या पीडित नुकसान भरपाई योजनेतून पैसे मिळाले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या अहवालानुसार सरकारी वकील यांनी कोर्टात अशी माहिती दिली की, मिर आणि सईदा यांचे प्रेमप्रकरण होते. मात्र, मिरचे हे प्रेमप्रकरण संपुष्टात आले आणि त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर भडकलेल्या सईदाने मिरला लग्न करण्यास सांगितले. २९ नोव्हेंबर २००८ साली सईदाने कोरामंगला येथील तिच्या दवाखान्यात मिरला बोलावले. त्यानंतर मिरला फळांच्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले. ते प्यायलानंतर मिर बेशुद्ध पडला. डॉक्टर महिलेने दवाखान्यातील साहित्य वापरून मिरचे गुप्तांग कापले. नंतर ती मिरला रुग्णालयात दाखल करून पळून गेली. 

डॉक्टर महिलेला रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि मिरच्या कुटुंबीयांनी गुप्तांग देण्याची मागणी केली. जेणेकरून मिरवर शस्त्रक्रिया होऊ शकत होती. मात्र सईदाने देण्यास नकार दिला. सईदाच्या वकिलाने ती निरागस असल्याचे कोर्टात सांगितले. सईदाने देखील दवाखान्यात येताना मिरचा अपघात झाल्याचा दावा केला. मात्र, कोर्टाला मिरच्या शरीरावर एकही जखम आढळून न आल्याने सईदाला दोषी ठरविण्यात आले. 

Web Title: Dentist women gets 10-year rigorous imprisonment for chops off boyfriends penis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.