संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:26 AM2024-10-05T10:26:29+5:302024-10-05T10:30:04+5:30

आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा शाळेतून परतत असताना विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

deoria shocking eve teasing video 4 men to 2 minor girls | संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड

संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड

उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा शाळेतून परतत असताना विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. त्यानुसार, बाईकवरून आलेल्या चार तरुणांनी आधी मुलींची छेड काढली, त्यामुळे मुली सायकलवरून खाली पडल्या. यानंतर एका मुलाने मुलीला शेतात जबरदस्तीने नेण्याचाही प्रयत्न केला.

विद्यार्थिनींनी यानंतर आरडाओरडा सुरू केला. "पप्पा वाचवा..." असं मुली म्हणत होत्या. संधी साधून एका विद्यार्थिनीने गोंधळ घालत तेथून जीव वाचवत पळ काढला. त्यानंतर मुलींचा आवाज ऐकून स्थानिक लोकही पोहोचले. मात्र तोपर्यंत बाईकवरून आलेले तरुण पळून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी सायकलवरून परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा देऊन त्या आपल्या घरी परतत होत्या. यावेळी त्यांची छेड काढण्यात आली.

या घटनेबाबत माहिती देताना देवरियाचे पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा म्हणाले की, काही बाईकवरून आलेल्या तरुणांकडून दोन मुलींची छेड काढण्यात आली. तसेच त्यांचा पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. मुलींनी तरुणांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. तक्रारीवरून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात आहे. याशिवाय आरोपींबाबत मुलींचीही चौकशी करण्यात येत आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलीस अधीक्षकांनी केला.
 

Web Title: deoria shocking eve teasing video 4 men to 2 minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.