उल्हासनगरमध्ये ३८ जणांवर हद्दपारीची कारवाई, गुन्हेगारीवर लागणार अंकुश!
By सदानंद नाईक | Published: July 12, 2023 04:41 PM2023-07-12T16:41:56+5:302023-07-12T16:42:23+5:30
या कारवाईने गुन्हेगारी वृत्तीच्या गुंड्यावर दहशद निर्माण होऊन गुन्ह्यात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगर : पोलीस परिमंडळ-४ मध्ये गुन्हेगारीच्या संख्येला आळा घालण्यासाठी तब्बल ३८ गुंडावर हद्दपरीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. या कारवाईने गुन्हेगारी वृत्तीच्या गुंड्यावर दहशद निर्माण होऊन गुन्ह्यात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील शिरू चौकातील सोन्याच्या दुकानात चोरी होऊन तब्बल ३ कोटी २० लाख रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी चोरून नेले. तर दोन दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी नरेश रोहिड़ा यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला. तसेच हाणामारी, खुनाचा प्रयत्न, फसवणुक, चोरी, गावठी दारूची विक्री, मटका जुगार आदींच्या गुन्ह्यात वाढ झाल्याची चित्र शहरात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, बलात्कार, विनयभंग आदी गुन्ह्या प्रकरणी उल्हासनगर पोलीस पोलीसमंडळाने तब्बल ३८ गुंडावर तडीपारची कारवाई केली.
उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गणपत रामधणी जैस्वार, अंकित संतोष दुबे, जावेद जाफर कुरेशी, सुरेश बाबुराव पाटील, करण उर्फ कचालू उर्फ कमलेश प्रकाशलाल तलरेजा, रहेमान सलीम शेख, रोहित उर्फ कन्हया आनंद गायकवाड, पवन उर्फ अजीत प्यारेलाल गुप्ता, विनोद भीमराव मोरे, हिरालाल दोंदे, इस्लम उर्फ मुन्ना अब्दुल शेख आदिवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिनाथ महादेव थोरात, नितीन पिराजी उर्फ नरेश आंबेकर, रॉबिन जगदीश करोतीया, राजा भाषकर साळवे तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलास सुरेश जाधव, अविनाश सुरेश जाधव, हर्ष परामसिंग थापा, वैभव चंद्रकांत कांबळे, हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहिल नरेंद्र गायसमुद्रे, प्रशांत वासुदेव भोईर तसेच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायब्या उर्फ साहेबराव तमन्ना जाधव, राहुल प्रेमचंद उपाध्याय, निषाद मोहम्मद सैय्यद, फहार उमर इंजिनिअर, कन्हेया अमरजित गुप्ता, रहिमतुल्ला बर्फ पापा सय्यद अली शेख, फिरोज अब्दुल अजीज पठाण, इंदिस उर्फ मोहद्दीन सैय्यद अलीं शेख, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितू प्रभू बाविस्कर, तेजस रवींद्र काळे, शंकर किसन गायकवाड, जयेश गोकुळ सोनवणे, राणा कादिर मलिक गोरख सखाराम भोईर, मनीष दिनेश चव्हाण आदी एकून ३८ जणांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.