भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:46 PM2019-09-02T17:46:15+5:302019-09-02T17:48:43+5:30
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर पाकिस्तानने कूलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याचा निर्णय घेतला.
इस्लामाबाद - हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांना कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली आहे. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर पाकिस्तानने कूलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारआज दुपारी साडेबारा वाजता भारताचे उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण यांची भेट घेतली. पाकिस्तानने दोन तासांसाठी कूलभूषण यांनी कॉउन्सिलर अॅक्सेस दिला होता. या भेटीत गौरव यांनी तुरुंगात कूलभूषण यांना पाकिस्तानातील तुरुंगात देण्यात येणाऱ्या वर्तणुकीबाबत माहिती घेतली. तसेच त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांच्या मदतीबाबतच्या मागण्या समजून घेऊन भारताची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने हे प्रकरण नेल्यानंतर न्यायालयाने कूलभूषण यांना ताताडीने कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते. त्यानुसार आज कुलभूषण यांच्याशी भारताच्या उप उच्चायुक्त यांची भेट झाली आहे.
Pakistan: The meeting between India's Deputy High Commissioner to Pakistan, Gaurav Ahluwalia and #KulbhushanJadhav begins. pic.twitter.com/nSqHGFF0nO
— ANI (@ANI) September 2, 2019
इस्लामाबाद - भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषणशी केली बातचीत https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2019