ओरा दालनातून उपव्यवस्थापकानेच चोरल्या सोन्याच्या बांगड्या, सीसीटीव्हीत कैद
By नामदेव भोर | Published: July 18, 2023 04:12 PM2023-07-18T16:12:06+5:302023-07-18T16:12:25+5:30
याप्रकरणात दुकानातील सहायक व्यावस्थापकाने संशयित उप व्यवस्थापक चेतन किशोर विसपुते याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
नाशिक : शहरातील शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर भागातील ओरा फाईन ज्वेलरी या दागिन्यांच्या दालनाच्या उप व्यवस्थापकानेच दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर हाथ साफ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणात दुकानातील सहायक व्यावस्थापकाने संशयित उप व्यवस्थापक चेतन किशोर विसपुते याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चेतन किशोर विसपुते हा कॅनडा कॉर्नर भागातील ओरा फाईन ज्वेलरी या दालानात उपव्यवस्थापक म्हणून कामाला होता. त्याने १७ जून २०१४ रोजी दालनातील ३ लाख ६२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या. मात्र ही बाब दालन व्यवस्थापकांच्या स्टॉकची पडताळणी करताना लक्षात आली. त्यामुळे दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
यात संशयित चेतन विसपुते सोन्याच्या बांगड्या दालनाबाहेर घेऊन जाताना दिसून आल्याने दालनाचे सहायक व्यावस्थापक संदेशलाल गोधवानी (३०, रा. कलानगर, जेलरोड) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यास संशयित विसपुते यांच्याविरोघात दागिन्याच्या चोरीची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विसपुते विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.