Ravi Rana : जामीन मिळूनही रवी राणांना आजची रात्रंही काढावी लागणार तळोजा कारागृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:30 PM2022-05-04T18:30:02+5:302022-05-04T19:11:47+5:30
Ravi Rana is still in Taloja jail tonight : कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.
पनवेल : आमदाररवी राणा यांना कोर्टाकडून जरी आज जामीन अर्ज मंजूर झाला असला तरी आजची रात्रही तळोजा कारागृहातच जाणार आहे. जामीनाची प्रत कारागृह प्रशासनाला अद्याप मिळाली नसल्याने राणा यांना बुधवारची म्हणजे आजची रात्र कारागृहातच घालवावी लागणार आहे. कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.
शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदाररवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर नवनीत राणा यांना तुरुंगांतून थेट रुग्णालयात नेण्यात आलं.
नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून थेट मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. रात्री त्यांना मान, पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आमदार रवी राणा यांची अद्याप तळोजा तुरुंगातून सुटका झालेली नाही.