नियतीला ते मान्य नव्हते! शेतकरी जोडप्याने गळफास घेतला, पण एकाची दोरी तुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 10:43 AM2022-09-13T10:43:59+5:302022-09-13T10:44:22+5:30

शेताजवळून दोन पोलीस जात होते, पोलिसांना काय प्रकार घडला असेल ते समजून आले. त्यांनी लगेचच शेताकडे धाव घेतली.

Destiny did not accept it! A farmer couple tried to hang themselves, but one of them broke the rope and saved in UP crime news | नियतीला ते मान्य नव्हते! शेतकरी जोडप्याने गळफास घेतला, पण एकाची दोरी तुटली

नियतीला ते मान्य नव्हते! शेतकरी जोडप्याने गळफास घेतला, पण एकाची दोरी तुटली

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी पत्नी-पत्नीने झाडाला दोऱ्या बांधून गळफास घेतला, परंतू पत्नीचा दोर तुटल्याने ती बचावली तर पतीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आग्र्यापासून ५० किमी दूर फतेहपूरच्या सीकरी भागात घडली आहे. 

मान सिंह आणि त्याची पत्नी संता देवी हे आपल्या घराशेजारीच असलेल्या शेतात गेले होते. घरातील वादाला कंटाळून त्यांनी तेथील रस्सी झाडाला बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दोरीचे तुकडे करून दोन गळफास झाडाला बांधले होते. एकाच वेळी दोघेही आत्महत्या करणार होते. पण ते नियतील मान्य नव्हते. यामुळे गळफास लावून घेतल्यावर पत्नीची दोरी तुटली आणि ती वाचली तर मान सिंह यांचा मृत्यू झाला आहे. 

पतीचा मृत्यू पाहून घाबरलेली संता देवी काही अंतरावर असलेल्या आपल्या घराकडे जात होती, तेवढ्यात तिला दोन पोलीस बाईकवरून जात असल्याचे दिसले. तिने त्यांच्याकडे मदत मागितली. तिच्या गळ्याला तुटलेला गळफास तसाच होता. पोलिसांना काय प्रकार घडला ते समजून आला. त्यांनी लगेचच शेताकडे धाव घेतली. मान सिंह यांना खाली उतरविले. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

अछनेराचे पोलीस अधिकारी राजीव सिरोही यांच्यानुसार गृह कलहामुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते. दोघांनाही चार मुले आहेत. त्यांची लग्ने झालेली आहेत. पती पत्नीचे एकमेकांसोबत पटत नव्हते. यामुळे त्यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी केली जाईल. 

Web Title: Destiny did not accept it! A farmer couple tried to hang themselves, but one of them broke the rope and saved in UP crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.