देवदल गावकऱ्यांचा वनकार्यालयावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:54 AM2019-03-22T02:54:00+5:302019-03-22T02:54:36+5:30
गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली.
पारोळ - गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. यात वनरक्षक अंकुश केंद्रे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी भारतीय वनअधीनियम व कर्मचारी संरक्षण नियम या नुसार कमलेश चौधरी, नागेश टबाळे, हरेश पझरा,मनोज थालकर, मेघनाथ कोठारी रा. बेळखडी कामण यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना वनविभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. वनाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री तुंगारेश्वर अभयारण्यतील कामण परिसरात वानवा लागल्याने वनकर्मचारी ते विझविण्यासाठी साठी गेले असता. त्यांना जंगलात आवाज आला. त्या दिशेने गेले असता. त्यांना त्या ठिकाणी शेकोटी पेटवून काही माणसे दिसली त्यांनी ती शिकारी साठी बसलेले असल्याचा संशय आल्याने त्यांनी पाच व्यक्तीना ताब्यात घेऊन वनकार्यालय गोखिवरे येथे आणले. ही बातमी पसरताच गुरुवारी सकाळी सात वाजता कामण बेळखडी या गावातील २०० नागरिकांनी या कार्यालयावर हल्ला करून मोठी तोडफोड केली.
या हल्ल्यात कार्यलयाचे मोठे नुकसान झाले. कर्मचारी ही गंभीर जखमी आहेत. वनरक्षण करत असताना असे हल्ले होत असल्याने कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
- नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल,
गोखिवरे कार्यालय