देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; सह आयुक्तांवर 'लक्ष' ठेवण्याची जबाबदारी
By मनीषा म्हात्रे | Published: January 4, 2023 04:34 PM2023-01-04T16:34:38+5:302023-01-04T16:36:47+5:30
देवेन भारती यांनी राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
देवेन भारती यांची मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाला पोलीस आयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, “अपर पोलीस महासंचालक” दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील “संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी” हे “अपर पोलीस महासंचालक” दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या पदाचे नामाभिधान “विशेष पोलीस आयुक्त” असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, हे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करतील.