भयंकर! न विचारता पाणी प्यायल्याची भयंकर शिक्षा; शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं, तोडला दात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:00 AM2023-01-25T11:00:13+5:302023-01-25T11:12:25+5:30
शिक्षकाने इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केली. यामध्ये त्याचा दात तुटला आहे.
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकाने इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केली. यामध्ये त्याचा दात तुटला आहे. न विचारता पाणी प्यायला म्हणून शिक्षा दिली आहे. खासगी शाळेतील शिक्षकाचा निर्दयी चेहरा समोर आल्याने शाळेत शिकणारे इतर विद्यार्थीही हैराण झाले आहेत. शिक्षकाच्या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याने हा प्रकार त्याच्या पालकाला सांगितला. त्यानंतर या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.
जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. खासगी शाळेत घडलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे प्रकरण होली ट्रिनिटी या खासगी शाळेचे आहे. शिक्षकाने इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मारहाणीमुळे दात तुटला. यानंतर मुलाने वडिलांना याबाबत माहिती दिली. बेदम मारहाण करणारा शिक्षक कोण आहे, याची तातडीने चौकशी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
इयत्ता 9वीत शिकणारा सक्षम जैन मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याच्या वर्गात पाणी पीत होता. त्याचवेळी शिक्षक पीटरने पाणी पिण्यास नकार देत बाटलीनेच मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे सक्षम जैन यांचा दात तुटला. अशा स्थितीत सक्षम हा त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचला. यानंतर सक्षमचे वडील त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन गेले.
जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी तातडीने दखल घेत डीपीसी प्रदीप जैन यांना चौकशीचे आदेश दिले. डीपीसी शाळेत पोहोचल्यावर जवळपास तासभर मुख्याध्यापक तेथे आलेच नाहीत. यानंतर डीपीसी जैन यांनी इयत्ता 9वीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे जबाब घेतले आणि सक्षमला मारणाऱ्या पीटरला याबाबत विचारलं. डीपीसीने शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले. आमची समिती लवकरच आरोपी शिक्षकाविरुद्ध निर्णय घेईल, असे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"