Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:39 PM2021-02-03T16:39:10+5:302021-02-03T16:39:47+5:30

Dhananjay Munde in trouble again : गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी  त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dhananjay Munde in trouble again; Karuna lodged a complaint with the Mumbai Police Commissioner | Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी  त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करुणा यांनी पोलीस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच,  मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले.  बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात.  माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे  चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

आज मेरा जन्मदिन हे पर मेरे पती ने 3 महीने से मेरे बच्चे छुपा के उसके बंगले चित्रकूटपे रखे हे मुझे मिलने ओर बात करने भी नहि दे रहा हे राजनीति की पावर का दूर उपयोग

Posted by Karuna Dhananjay Munde on Monday, February 1, 2021

'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया

कोण आहे करुणा ?

मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यात करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.

करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र २०१९९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असे नमूद केले होते.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीची माघार

तक्रार अर्ज़ात करुणा धनंजय मुंडे नावाचा वापर

करुणा शर्मा यांनी आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्ज़ात करुणा धनंजय मुंडे असा उल्लेख केला आहे. 


आज मेरा जन्मदिन हे पर मेरे पती ने 3 महीने से मेरे बच्चे छुपा के उसके बंगले चित्रकूटपे रखे हे मुझे मिलने ओर बात करने भी नहि दे रहा हे  राजनीति की पावर का दूर उपयोग
इतना अत्याचार तो रावण ने भी नहि किया होगा

Posted by Karuna Dhananjay Munde on Monday, 1 February 2021

कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आराेप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली तरी पुन्हा एक नवं संकट मुंडेंच्या मागे लागले आहे. कौटुंबिक कारण तसेच या तक्रारीमुळे होत असलेल्या राजकारणामुळे माघार घेत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते.  याबाबत ट्विट करून त्यात मुंडे यांच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे तिने नमूद केले. तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला. याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला हाेता, तर गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रारदार तरुणीविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तरुणी मुंडे यांना अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे मुंडे हे तणावात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.

#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत कालपासून समाज...

Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021

फेसबुकवर काय म्हणतात करुणा ?

आज माझा वाढदिवस आहे, परंतु माझ्या पतीने माझ्या मुलांना 3 महिने चित्रकूटमध्ये त्यांच्या बंगल्यात  लपवून ठेवले आहे आणि मला भेटू, बोलूही देत नाही. राजकीय ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. रावणानेही इतका अत्याचार केला नसता.  

Read in English

Web Title: Dhananjay Munde in trouble again; Karuna lodged a complaint with the Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.