धारावीत तृतीयपंथीयांनी धक्काबुकी केल्याने पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:51 PM2020-06-17T19:51:44+5:302020-06-17T19:56:24+5:30
१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : एका तृतीयपंथीने जमातीबाहेरच्या महिलेसोबत संबंध ठेवल्याने, त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १५ हून अधिक तृतीयपंथीनी धारावी पोलीस ठाण्याबाहेरच मंगळवारी रात्री ठिय्या आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाधक्काबुक्की केल्याने ३ पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी धारावी पोलिसांनी १५ ते १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास १५ ते १६ तृतीयपंथी पोलीस ठाण्यात धडकले. त्यांच्यातील एकाने जमातीबाहेरच्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार एकाने दिली. संबंधितावर तात्काळ कारवाई करून त्याला कोठड़ीत टाकण्यासाठी पोलीस ठाण्यातच धिंगाणा सुरु केला. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असतानाही, त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी त्यांना जमाव न करता घरी जाण्यास सांगताच, तृतीयपंथीनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन छेडले. पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्याने सर्व जण नग्न झाले. अखेर तासाभराच्या गोंधळानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत त्यांना तेथून हटविले. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, दंगल सारख्या विविध कालमांअंतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश नांगरे यांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल
... म्हणून 'त्या' नवरदेवावर झाला गुन्हा दाखल ; ग्रामपंचायतने केली कारवाई
Shocking! ऑनलाईन अभ्यासाच्या तणावात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या