युवकाचा रहस्यमय मृत्यू, कुटुंब हादरले; रात्री उशिरा खोलीत झोपायला गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:39 AM2022-10-18T09:39:37+5:302022-10-18T09:40:30+5:30
हरी सिंह कुशवाहा ट्रॅक्टर चालवून घर चालवत होता. कुटुंबात तो एकमेव व्यक्ती कमावता होता.
धौलपूर - राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात एका युवकाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. मृत हा त्याच्याच खोलीत पत्नीसह अर्धनग्न अवस्थेत बेशुद्धावस्थेत आढळून आला, त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपसपूर गावातील हरिसिंह कुशवाहा हे घरी रात्री उशिरा खोलीत झोपले होते. सकाळी जेव्हा त्यांच्या खोलीत पाहिले तेव्हा अर्धनग्न स्थितीत बेशुद्ध अवस्थेत आढळले. जेव्हा त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीही हालचाल झाली नाही. तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले. ज्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉस्पिटलला पोहचून हरी सिंह कुशवाहा यांचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. या मृत्यूचं रहस्य उलगडण्यासाठी पोस्टमोर्टम रिपोर्टची प्रतिक्षा करावी लागेल अशी माहिती तपास अधिकारी एएसआय बलकेश्वर दत्त यांनी दिली. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, हरी सिंह ट्रॅक्टर चालक होता. त्याला ४ मुले आहेत. त्यांना कुठलाही आजार नव्हता. रात्री ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी खोलीत अर्धनग्न स्थितीत ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हरी सिंह कुशवाहा ट्रॅक्टर चालवून घर चालवत होता. कुटुंबात तो एकमेव व्यक्ती कमावता होता. अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून रुपसपूर गावात शोककळा पसरली आहे. हरी सिंह कुशवाहा यांना ४ लहान मुले आहेत. पोलीस सूत्रांनुसार, मृत हरी सिंह कुशवाह यांनी सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधाचं सेवन केले होते. त्याच्या अतिडोसामुळे कदाचित त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. परंतु अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर या मृत्यूचा खुलासा होऊ शकतो असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.