हिरे व्यापाऱ्यांना हिरे ब्रोकरने लावला ३० कोटींचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:38 PM2018-12-26T20:38:53+5:302018-12-26T20:39:59+5:30

याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर मुख्य आरोपी फरार आहे. 

The diamond broker has chosen 30 crores for diamond merchants | हिरे व्यापाऱ्यांना हिरे ब्रोकरने लावला ३० कोटींचा चुना 

हिरे व्यापाऱ्यांना हिरे ब्रोकरने लावला ३० कोटींचा चुना 

Next
ठळक मुद्दे यतीन मखेकीया आणि विजय परमार या दोघांनी कोटी रुपयांना हिरे विकून फसवणूक केली पोलिसांनी कांदिवली येथून विजय परमारला जेरबंद केले आहे. मुख्य आरोपी यतीन मखेकीया हा फरार हिऱ्यांचा ब्रोकर असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  

मुंबई - वांद्रे - कुर्ला संकुल परिसरात ३० हिरे व्यापाऱ्यांना प्रत्येकी १ कोटीचा बनावट हिरा विकून ३० कोटींचा चुना लावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर मुख्य आरोपी फरार आहे. 

बीकेसी परिसरात हिरे व्यापाऱ्यांना यतीन मखेकीया आणि विजय परमार या दोघांनी कोटी रुपयांना हिरे विकून फसवणूक केली आहे. याप्रकरणी ३० हिरे व्यापाऱ्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कांदिवली येथून विजय परमारला जेरबंद केले आहे. पोलिसांनी परमारची चौकशी केली असता, त्याने यतीनने माझ्याकडे हे हिरे दिले आणि तुला जेव्हा गरज लागेल त्यावेळी वापर असे सांगितले असल्याचे सांगितले. मुख्य आरोपी यतीन मखेकीया हा फरार हिऱ्यांचा ब्रोकर असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  

Web Title: The diamond broker has chosen 30 crores for diamond merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.