गळफास देण्याची क्षमता ‘त्या’ कपड्यात होती का? फॉरेन्सिक विभागाकडून होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 06:13 AM2020-07-05T06:13:47+5:302020-07-05T06:14:13+5:30
सुशांत (३४) हिरव्या रंगाच्या कपड्याने त्याच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत १४ जून, २०२० रोजी आढळला. त्याचे वजन जवळपास ८० किलो होते, ते वजन तो कपडा पेलू शकणार नाही, असे लाखो चाहत्यांचे म्हणणे आहे.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले. मात्र त्याच्या चाहत्यांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने आता ज्या कपड्याने त्याने गळफास घेतला त्याच्या क्षमतेची चौकशी फॉरेन्सिक विभागाकडून केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुशांत (३४) हिरव्या रंगाच्या कपड्याने त्याच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत १४ जून, २०२० रोजी आढळला. त्याचे वजन जवळपास ८० किलो होते, ते वजन तो कपडा पेलू शकणार नाही, असे लाखो चाहत्यांचे म्हणणे आहे. यामागचे तथ्य जाणून घेण्यासाठी पोलीस त्या कपड्याची क्षमता तपासतील. ज्याचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत फॉरेन्सिक लॅबकडून त्यांना मिळेल.
दरम्यान, निर्माते संजय लीला भन्साळी यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. ‘गोलियों की रामलीला’ चित्रपटातून सुशांतला काढून रणवीर सिंगला त्यांनी मुख्य भूमिका देण्यामागचे कारण तपासले जाईल.