पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हाला आले? बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइलद्वारे होतेय फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 06:26 AM2022-08-27T06:26:01+5:302022-08-27T06:26:28+5:30

एका खरेदी-विक्री संकेतस्थळाचे गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Did you get the Police Commissioner's gift card Fraud is done through fake WhatsApp profiles | पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हाला आले? बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइलद्वारे होतेय फसवणूक

पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हाला आले? बनावट व्हॉट्सॲप प्रोफाइलद्वारे होतेय फसवणूक

Next

मुंबई

एका खरेदी-विक्री संकेतस्थळाचे गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, चौकशीत सायबर ठगाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हॉटस्अॅप प्रोफाइल तयार करून अशा पद्धतीने गिफ्ट कार्ड पाठवल्याचा प्रताप समोर आला आहे. अशा कुठल्याही संदेशाला बळी पडू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आरोपींनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फणसळकर यांचे छायाचित्र  भामट्यांनी व्हॉटस्अॅप प्रोफाइल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणुकीला बळी पडले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फसवणूक टोळीने तयार केलेला संदेश प्रसारित केला आणि सर्व पोलीस अधिकारी आणि नागरिकांना या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले असल्याचे उपायुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी सांगितले. 

यापूर्वी सायबर ठगांकडून पोलीस महासंचालक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, आयकर विभागाचे मुंबई प्रमुख, महावितरणचे एमडी, वरिष्ठ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांना याच पद्धतीचा वापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

संदेशात नेमके काय?
- ९३२९६०३२९४ या मोबाइल क्रमांकाचा अनोळखी मोबाइलधारकाने स्वतःचे व्हॉटस्अॅप डीपीवर पोलीस आयुक्तांचा गणवेशातील फोटो ठेवला आहे.

- त्याआधारे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे नावे ॲमेझॉन पेई गिफ्ट विथ १०००० व्हॅल्यूची मागणी करीत असून, ते गिफ्ट लवकरात लवकर देण्याची विनंती करण्यात येत आहे.

अशाप्रकारे गिफ्ट अथवा इतर कोणत्याही प्रकारची मागणी करीत असल्याचा संदेश प्राप्त झाल्यास अथवा निदर्शनास आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. मुंबई पोलीस यासंदर्भात कायदेशीर कारवाई करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

यापूर्वी सायबर ठगांकडून पोलीस महासंचालक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, आयकर विभागाचे मुंबई प्रमुख, महावितरणचे एमडी, वरिष्ठ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांना याच पद्धतीचा वापर करून फसणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Web Title: Did you get the Police Commissioner's gift card Fraud is done through fake WhatsApp profiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.