परिवहनच्या बसमधून डिझेलची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:22 IST2019-06-11T20:19:30+5:302019-06-11T20:22:19+5:30
तुळींज पोलीस ठाण्यात डिझेल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे

परिवहनच्या बसमधून डिझेलची चोरी
नालासोपारा - पूर्वेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या सेन्ट्रल पार्क परिसरात पार्क केलेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन बसच्या डिझेल टाकीमधून डिझेलची चोरी करत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला आहे. तुळींज पोलीस ठाण्यात डिझेल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क परिसरातील भाजी मार्केटच्या बाजूला व पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर महानगरपालिकेच्या परिवहन बस रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ठेवलेल्या असतात. शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी पार्क करून ठेवलेल्या बसच्या (क्रमांक एम एच 48 के 377) डिझेल टाकीमधून एका कॅनमध्ये 660 रुपये किंमतीचे 10 लिटर डिझेल हितेश वल्लभ पटेल हा चोरी करत असताना मिळून आला. त्याला मोहम्मद सलाउद्दीन अन्सारी यांनी हितेशला पकडून विचारणा केल्यावर हाताला झटका मारून पळून गेला. त्यांनतर अन्सारी यांनी तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगून तक्रार दिली आहे.