गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील अडचणी वाढल्या; सोलापुरात देखील गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:40 PM2022-04-20T17:40:45+5:302022-04-20T17:43:26+5:30

Gunratna Sadavarte :भादंवि कलम 153अ ब, 500, 506, 507 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Difficulties increased on Gunaratna Sadavarte; A case was also registered in Solapur | गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील अडचणी वाढल्या; सोलापुरात देखील गुन्हा दाखल

गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील अडचणी वाढल्या; सोलापुरात देखील गुन्हा दाखल

googlenewsNext

सोलापूर - सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.  मराठा आरक्षणाच्या निकालासंदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दलआणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा पुरावा देत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153अ ब, 500, 506, 507 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिल्यांदा साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात सदावर्तेविरोधात गुन्हे झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले होते. तर त्यांना अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी कोल्हापुरातील न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतू याची सुनावणी लांबणीवर पडल्याने आणि त्यातच सातारा पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर सातारा न्यायालयाकडून जामीन मिळाल्याने कोल्हापूर पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता. 

 

सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी अँड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अँड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंनी प्रयत्न केला असल्याचेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांना आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यत त्यांना कोल्हापूरात आणण्यात येणार आहे. गिरगाव न्यायालयाने हा ताबा देण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्याच न्यायालयात ताबा मिळण्यासाठी अकोट पोलिसांनीही अर्ज केला आहे. सदावर्तेचा ताबा घेऊन पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. तो रात्री उशीरापर्यत कोल्हापूरात पोहचण्याची शक्यता आहे.

Web Title: Difficulties increased on Gunaratna Sadavarte; A case was also registered in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.