दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:45 PM2024-11-01T13:45:49+5:302024-11-01T13:46:08+5:30

Digital Arrest Scam: यावर्षी आतापर्यंत 2140 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Digital Arrest Scam: 6 crore fraud every day, victims of digital arrest scam | दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान

दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान

Cyber Fraud : सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. आजकाल डिजिटल अरेस्ट, पद्धत खूप चर्चेत आली आहे. MHA सायबर विंग (i4C) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे लुटमारी टोळी या नवीन पद्धतीचा वापर करून दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक करत आहेत.

या घोटाळ्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. डिजिटल अटकेची पद्धत वापरून आरोपींनी यावर्षी आतापर्यंत 2140 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. दर महिन्याला सायबर गुन्हेगार या पद्धतीचा वापर करून लोकांची सरासरी 214 कोटी रुपयांची फसवणूक करत आहेत.

परदेशातून चालणारे नेटवर्क
फसवणुकीच्या या प्रकारात घोटाळेबाज ईडी, सीबीआय, पोलीस किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. मग सर्वसामान्यांना कुठल्यातरी खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देतात. दररोज अनेक लोक या फसवणुकीच्या पद्धतीचे बळी ठरतात. ही फसवणूक कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड या देशांमधून होत आहे.

कंबोडियातील चिनी कॅसिनोमध्ये उभारलेल्या कॉल सेंटरमध्ये डिजिटल अरेस्ट केंद्रे सर्रासपणे सुरू आहेत. MHA सायबर विंगला या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डिजिटल अटकेच्या एकूण 92,334 प्रकरणांची माहिती मिळाली आहे. तुम्ही अशा घोटाळ्याला बळी पडल्यास ताबडतोब 1930 वर कळवा.

डिजिटल अटक म्हणजे काय?
या प्रकारच्या फसवणुकीत सायबर गुन्हेगार तुम्हाला तुमच्या कामावर ट्राय, आरबीआय किंवा कोणत्याही कुरिअर कंपनीमार्फत कॉल करतात. हे आयव्हीआर कॉल्स आहेत, ज्यामध्ये तुमचा नंबर किंवा बँक खाते ब्लॉक करण्यात आल्याचे सांगितले जाते. किंवा योग्य पत्ता न मिळाल्यामुळे तुमचा कुरियर डिलिव्हरी करू शकत नाही.

या कॉलमध्ये कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलण्यासाठी 9 (हा नंबर दुसराही असू शकतो) दाबायला सांगितले जाते. एखादी व्यक्ती कस्टमर सपोर्ट ऑफिसरशी बोलताच त्यांचा घोटाळा सुरू होतो. सर्वप्रथम ते तुम्हाला सांगतील की, तुमच्या नावावर कर्ज आहे का किंवा बनावट सिम वापरले जात आहे किंवा तुमचे आधार कार्ड ड्रग्जसह पकडले गेले आहे.

यानंतर ते तुम्हाला बनावट पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रकरणात हे घोटाळेबाज सुप्रीम कोर्ट, पोलिस, सीबीआय अशा संस्थांच्या नावाने तुम्हाला घाबरवतात. बनावट केस तयार करून, 'डिजिटल अदालत'मध्येही सुनावणी सुरू केली जाते. या सगळ्यासाठी तुम्हाला डिजिटली अटक केली जाते.

डिजिटल अटकेत घोटाळेबाज तुम्हाला कोणाशीही बोलू देत नाहीत, कोणाशीही भेटू देत नाहीत किंवा घराबाहेर पडू देत नाहीत. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण कुटुंबालाच त्याचा बळी बनवण्यात आले आहे. यामध्ये, सर्व बनावट कृती केवळ स्काईप कॉल किंवा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर केल्या जातात. शेवटी प्रकरण दडपण्यासाठी घोटाळेबाज तुमच्याकडून पैशांची मागणी करतील. 

Web Title: Digital Arrest Scam: 6 crore fraud every day, victims of digital arrest scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.