सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याने दिलीप सोनावणे यांनी मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 06:16 PM2018-10-12T18:16:10+5:302018-10-12T18:46:20+5:30

स्वतः सोबत आणलेल्या छोट्या बॉटलमधील फिनाईल पिण्याचा प्रयत्न केला.परंतु आसपासच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.  

Dilip Sonawane tried to commit suicide due to forced retirement | सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याने दिलीप सोनावणे यांनी मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न 

सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याने दिलीप सोनावणे यांनी मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न 

googlenewsNext

मुंबई - उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागातील शिपाई म्हणून काम करणारे दिलीप सोनावणे यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याने सोनावणे यांनी या  विभागाच्या प्रधान सचिवांशी हुज्जत घातली. नंतर स्वतः सोबत आणलेल्या छोट्या बॉटलमधील  फिनाईल पिण्याचा प्रयत्न केला.परंतु आसपासच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.  

सोनावणे यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने विभागाने केलेल्या विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळले.त्यामुळे सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. या सेवानिवृत्तीच्या वादामुळे ते या विभागाच्या प्रधान सचिवांशी हुज्जत घालत होते. सोनवणे मंत्रालयात उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. स्टेशनरी, पंखे आदी सरकारी साहित्य विकणे, वारंवार गैरहजर राहणे अशा आरोपांवरून कामगार विभागाचे उपसचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या समितीकडून त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर त्यांना सेवेतून काढून न टाकता सोनवणे यांना सक्तीने सेवानिवृत्त करावे, असा निर्णय झाला. सक्तीने सेवानिवृत्त केल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतनासह इतर फायदे मिळू शकतील. तसेच त्यांना सेवेतून काढल्यास त्यांच्या कुटुंबियांना काहीही मिळणार नाही. त्यामुळे सहानुभूतीचा विचार करत समितीने हा निर्णय घेतला.

शासनाने काल सोनवणे यांना सक्तीने सेवानिवृत्त केले. परंतु हा आदेश सोनवणे यांनी काल स्वीकारला नाही. आज मंत्रालयात ते आपल्या पत्नी-मुलासह आले. कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला. आपल्याला बढती मिळणार होती. त्यामुळेच आपल्याला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आल्याचा दावा करत सोनवणे यांनी फिनाईल  घेण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Dilip Sonawane tried to commit suicide due to forced retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.