गुरांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दुकलीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 08:24 PM2020-07-24T20:24:45+5:302020-07-24T20:25:27+5:30

मोहने परिसरात राहणारे दूध विक्रेते संतोष सिंग यांच्या तबेल्यासमोर झाडाला बांधलेली जर्सी गाय चोरी करुन तिला कापली होती.

Dio arrested for stealing and killing cattle | गुरांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दुकलीस अटक

गुरांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दुकलीस अटक

Next
ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अफजल तस्लीम खान (33) आणि कैस मतरूझा डोन (31) अशी आहेत.

कल्याण - गुरांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दुकलीस खडकपाडा पोलिसांनीअटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अफजल तस्लीम खान (33) आणि कैस मतरूझा डोन (31) अशी आहेत. यासंदर्भातील माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आज दिली. 

 

मोहने परिसरात राहणारे दूध विक्रेते संतोष सिंग यांच्या तबेल्यासमोर झाडाला बांधलेली जर्सी गाय चोरी करुन तिला कापली होती. तिचे काही अवशेष त्याच ठिकाणी सोडून कत्तल करणारे चोरटे पसार झाले होते. ही घटना 5 जून रोजी घडली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेपाठोपाठ 19 जुलै रोजी मोहने परिसरातील रोशन जगताप यांच्या घर परिसरात फिरणारी काळी व तपकीरी रंगाची गाय काही अज्ञात चोरटय़ांनी चोरी केली. तिची कत्तल रस्त्याच्या कडेला केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपास पथकाने आरोपी खान याला भिवंडी येथील नदी नाका येथून अटक केली. तर दुसरा आरोपी डोन याला आंबिवली येथून अटक केली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : पालिकेच्या कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्णांचे पलायन, पोलिसांकडे तक्रार दाखल 

 

Web Title: Dio arrested for stealing and killing cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.