थेट दिल्लीतील बँकेत साधला संपर्क; ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी मिळवून दिले सव्वापाच लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:54 PM2021-09-29T21:54:17+5:302021-09-29T21:56:54+5:30
Crime News : चितळसर पोलिसांनी ती संपूर्ण रक्कम अवघ्या 48 तासांमध्ये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.
ठाणे : एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणुकीने पाच लाख 30 हजार 140 रुपयांची रक्कम लुबाडण्यात आली होती. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून चितळसर पोलिसांनी ती संपूर्ण रक्कम अवघ्या 48 तासांमध्ये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.
आयसीआयसीआय बँकेच्या लोकपुरम शाखेत या नागरिकाचे आण त्यांच्या मुलाचे संयुक्त बचत खाते आहे. त्यांचा हा लहान मुलगा शिक्षणासाठी आयर्लंड येथे वास्तव्याला आहे. आयरीश सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून 21 सप्टेंबर 2021 रोजी तुमच्या मुलाने बेकायदेशीरपणो अमेरिकन वेबसाईट बघितली आहे. वेबसाईटकडे तुझा मोबाइल नंबर आणि अकाउंट डिटेल आहेत, ते तुङो अकाउंट हॅक करून पैसे काढून घेऊ शकतात. असे कारण सांगून अज्ञात आरोपीने त्यांच्या मुलाला फोनद्वारे बतावणी केली. त्या मुलाने फोनवरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणो कृती केली. यातून त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख 30 हजारांची रोकड वळती केली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात 24 सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, सहायक पोलीस निरीक्षक पी. जे. सुरवाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जलदगतीने तपास केला. त्यांनी या बँक खात्याची माहिती मिळवून आरोपीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, रोहिणी, नवी दिल्ली येथील खात्यात फिर्यादी यांची फसवणूक झालेली रक्कम आढळली. हे खाते गोठविण्यासाठी बँकेच्या अधिका-यांशी संपर्क साधून मेलद्वरे पत्नव्यवहार केला. या बँक अधिकार्यांनी फिर्यादी यांच्या लोकपुरम येथील शाखेमध्ये पाच लाख 25 हजारांची रक्कम वळती केल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने समाधान व्यक्त केले.