'तांडव'च्या डायरेक्टर, स्टारकास्टची होणार चौकशी, युपी पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना
By पूनम अपराज | Published: January 18, 2021 09:22 PM2021-01-18T21:22:04+5:302021-01-18T21:22:59+5:30
Tandav Webseries : लखनऊच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर चार पोलीस अधिकारी तपासासाठी मुंबईला गेले आहेत.
लखनऊ - लखनऊमध्ये अॅमेझॉन प्राईमच्या वेबसीरिज तांडवविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यूपी पोलिसांच्या हुशार पोलीस अधिकाऱ्यांचे पथक पुढील कारवाईसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. लखनऊच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर चार पोलीस अधिकारी तपासासाठी मुंबईला गेले आहेत. हे अधिकारी वेबसीरिजचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांची चौकशी करू शकतात.
शुक्रवारी रिलीज झालेल्या वेब सीरिजमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याची दृश्ये आहेत. दुसरीकडे मिर्जापूरमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
मायावतींनी हे दृश्य हटवण्याची मागणीही केली
बसपा सुप्रीमो मायावती यांनीही वेब सीरिजमधील , ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, ती दृश्ये हटविण्याची मागणी केली आहे. एका ट्वीटमध्ये मायावती म्हणाल्या, "धार्मिक आणि जातीय भावना दुखावणाऱ्या काही दृश्यांबाबत तांडव वेब सीरिजविरोधात निषेध नोंदवले जात आहेत, त्या संदर्भात जे काही आक्षेपार्ह असेल त्यांनी काढून टाकणे योग्य ठरेल जेणेकरून देशात कोठेही शांतता, सुसंवाद आणि परस्पर बंधुतेचे वातावरण खराब होऊ नये.
त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला यापूर्वी लखनऊच्या हजरतगंजमध्ये अॅमेझॉन प्राइमच्या इंडियाचे प्रमुख अपर्णा पुरोहित, तांडव दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू कृष्णा मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. या संदर्भात हजरतगंजचे वरिष्ठ उपनिरीक्षक अमरनाथ यादव यांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसिद्ध झालेल्या ‘तांडव’ या वेब मालिकेवर बर्याच लोकांनी आक्षेप घेतल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
वेब सीरिजबाबत कोणता वाद आहे?
रविवारी रात्री पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, वेब सीरिजच्या पहिल्या भागामध्ये हिंदू देवतांची चुकीची माहिती दिली गेली होती, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यामध्ये अप्रिय भाषा देखील वापरली गेली आहे, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी निर्माता-दिग्दर्शक, लेखक आणि वेबसीरिजमधील इतरांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.
केंद्रानेही जाब विचारला
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानेही ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवण्याशी संबंधित तक्रारींची दखल घेतली असून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरून या विषयावर स्पष्टीकरण मागितले आहे. वेब मालिकेत कोण कोण आहे अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, मोहम्मद झीशान अयूब, गौहर खान आणि कृतिका काम्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'तांडव'चा शुक्रवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रीमियर झाला. हिमांशु किशन मेहरा यांच्यासह चित्रपट निर्माता अली अब्बास जफर यांनी या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन राजकारणावर आधारित केले आहे. याची पटकथा गौरव सोलंकी याने लिहिली आहे.