बेपत्ता जीएसटी सहआयुक्त गेले देवदर्शनाला, मोबाईल ऑफिसमध्ये विसरल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:37 PM2022-01-06T17:37:55+5:302022-01-06T17:38:22+5:30

GST Joint Commissioner Missing :त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे, मोबाईल कार्यालयात विसरल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता. 

Disappeared GST Joint Commissioner went to Devdarshan, confusion in mobile office | बेपत्ता जीएसटी सहआयुक्त गेले देवदर्शनाला, मोबाईल ऑफिसमध्ये विसरल्याने गोंधळ

बेपत्ता जीएसटी सहआयुक्त गेले देवदर्शनाला, मोबाईल ऑफिसमध्ये विसरल्याने गोंधळ

Next

मुंबई : जीएसटीचे सहआयुक्त राजेसाहेब माने (५५) बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी बुधवारी रात्री भायखळा पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करत अधिक तपास सुरु केला होता. मात्र बेपत्ता झालेले जीएसटी सहआयुक्त देवदर्शनाला गेले होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे, मोबाईल कार्यालयात विसरल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता. 

कांदिवली येथे राहात असलेले राजेसाहेब माने (५५) हे जीएसटी विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते माझगाव येथील जीएसटी भवनमधील कार्यालयात हजर झाले होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ना ते कार्यालयात परतले. ना घरी पोहचले.माने यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते न सापडल्याने अखेर कुटुंबियांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून माने हरवल्याची तक्रार दिली आहे. त्यांचे फ़ोटो सोशल मिडियावर व्हायरल करत त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास मुंबई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. दुपारी झूम मिटिंग झाल्यानंतर मोबाईल कार्यालयातच ठेवून ते निघून गेले होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

Web Title: Disappeared GST Joint Commissioner went to Devdarshan, confusion in mobile office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.