दिल्ली पोलिसांनी पकडलं ६० कोटींचं 'डिस्को बिस्किट'; जाणून घ्या नेमकं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:28 AM2023-03-11T10:28:55+5:302023-03-11T10:29:30+5:30

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या ड्रग्जची किंमत ६० कोटी असल्याचं म्हटलं आहे. या ड्रग्सचं नाव आहे 'डिस्को बिस्किट'.

'Disco Biscuits' worth Rs 60 Crores seized by Delhi Police; Know what exactly? | दिल्ली पोलिसांनी पकडलं ६० कोटींचं 'डिस्को बिस्किट'; जाणून घ्या नेमकं काय आहे?

दिल्ली पोलिसांनी पकडलं ६० कोटींचं 'डिस्को बिस्किट'; जाणून घ्या नेमकं काय आहे?

googlenewsNext

नवी दिल्ली - तुम्ही हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'The Wolf of Wall Street' पाहिला असेल. त्या चित्रपटात मुख्य भूमिका करणारा हिरो अमली पदार्थाचे सेवन करतो. ते ड्रग कोणतं हे तुम्हाला माहिती आहे? लोक चित्रपटांमध्ये दाखवलेल्या चांगल्या तर कधी वाईट गोष्टींचा अवलंब खऱ्या आयुष्यात करतात. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणार्‍या आफ्रिकन वंशाच्या तरुणांनी या हॉलिवूड चित्रपटात वापरलेले ड्रग्ज हे त्यांच्या कमाईचं साधन बनवलं आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ३ जणांना अटक केल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या ड्रग्जची किंमत ६० कोटी असल्याचं म्हटलं आहे. या ड्रग्सचं नाव आहे 'डिस्को बिस्किट'. हे नाव ऐकल्यावर तुम्हाला ते एका डिस्को लाईटसारखं नक्कीच वाटलं असावं. हे खास ड्रग्स ग्रेटर नोएडातील एका महागड्या भागात ठेवण्यात आले होते. तेथून आणून दिल्लीत विकले जात होते. विशेष पोलीस आयुक्त धालीवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी आतापर्यंत ३ तस्करांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ तस्करीचा मालक पश्चिम आफ्रिकन देशाचा आहे. अटक केलेले तिघेजण गेल्या २ वर्षांपासून हा व्यवसाय करत होते. आरोपी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते असं तपासात समोर आले आहे. 

डिस्को बिस्किट म्हणजे काय ते जाणून घ्या
डिस्को बिस्किट हे खरे तर एका ड्रगचं नाव आहे. त्याचं मूळ नाव Methaqualone आहे. हे ड्रग्स प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट'मधून चर्चेत आले. भारतात या ड्रग्जवर बंदी आहे. जर कोणी त्याचे सेवन, खरेदी व विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यान्वये कारवाई केली जाते. यूएसमध्ये ते १९८३ मध्ये बाजारातून हटवण्यात आले. १९८४ मध्ये शेड्यूल १ ड्रग्स श्रेणीत त्याची नोंद ठेवली आहे.

दिल्ली पोलिसांनी सापळा रचला
विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, ३ आरोपींपैकी एक Ahukajude याला आम्ही ४ मार्च रोजी अटक केली होती. धौला कुआनजवळील पेट्रोल पंपावर तो ड्रग्जची खेप घेऊन येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही त्याला ठरलेल्या ठिकाणी पकडल्यावर त्याने सर्व गुपिते उघड केली. त्याने सांगितले की, तो दिल्ली-एनसीआरमध्ये चालणाऱ्या ड्रग कार्टलचा सदस्य आहे. आफ्रिकन नागरिक ते चालवत आहेत. तो ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या अन्य अटक आरोपी उमरलब्राहिमकडून ड्रग्ज खरेदी करत असे. आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मार्च रोजी जनकपुरीजवळील माता चानन देवी हॉस्पिटलजवळ उमरलब्राहिमला अटक केली. तोही तिसरा आरोपी चिनीजीकडून ड्रग्ज मिळवायचा असे आरोपीने सांगितले. या आधारे पोलिसांनी ६ मार्च रोजी चिनीजीला अटक केली.
 

Web Title: 'Disco Biscuits' worth Rs 60 Crores seized by Delhi Police; Know what exactly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.