मायलेकाच्या नात्याला काळिमा! जन्मदात्या आईला मुलाने अन् सुनेनं जिवंत जाळले 

By पूनम अपराज | Published: November 2, 2020 09:25 PM2020-11-02T21:25:50+5:302020-11-02T21:29:15+5:30

Murder : या घटनेत मुलाची आई खूप भाजली असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Disgrace to mother and son relationship! The birth mother was burnt alive by her son and daughter in law | मायलेकाच्या नात्याला काळिमा! जन्मदात्या आईला मुलाने अन् सुनेनं जिवंत जाळले 

मायलेकाच्या नात्याला काळिमा! जन्मदात्या आईला मुलाने अन् सुनेनं जिवंत जाळले 

Next
ठळक मुद्दे या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, महिलेचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.   रत्ना देवी (५८) असं पीडित महिलेचे नाव आहे. 

शहाजहाँपूर - उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूरमध्ये मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईला मुलगा आणि सूनेने जिवंत जाळले. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. या घटनेत मुलाची आई खूप भाजली असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रत्ना देवी (५८) असं पीडित महिलेचे नाव आहे. 

तिचा मुलगा आकाश गुप्ता आणि त्याची पत्नी दीप शिखा तसेच आकाशच्या सासू-सासऱ्यांनी महिलेला जिवंत पेटवून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. शहाजहाँपूरच्या पोलीस अधीक्षक अपर्णा गौतम यांनी सांगितले की, ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे. मुलाने आणि सुनेने पेटवल्यानंतर आई अंगाला आगीच्या झळा लागल्याने किंचाळू लागली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिला वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले.

 

त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर भाजल्याने चिंताजनक होती असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आकाश गुप्तासह पत्नी दीपशिका, सासरे अच्छेलाल आणि नातेवाईक विनोद यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, महिलेचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

Web Title: Disgrace to mother and son relationship! The birth mother was burnt alive by her son and daughter in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.