काय होतं दिशा सालियनच्या मृत्यूचं कारण? समोर आला पोस्टमार्टम रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 10:04 IST2020-08-06T09:56:59+5:302020-08-06T10:04:47+5:30
काही दिवसांपूर्वीच एका भाजपा नेत्याने गंभीर आरोप लावले होते की, दिशा आणि सुशांत दोघांचाही मर्डर झाला आहे.

काय होतं दिशा सालियनच्या मृत्यूचं कारण? समोर आला पोस्टमार्टम रिपोर्ट
सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यूबाबतही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला हे मानलं जात आहे. पण सुशांतच्या मृत्यूनंतर दिशाचं कनेक्शन त्याच्या मृत्यूशी जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका भाजपा नेत्याने गंभीर आरोप लावले होते की, दिशा आणि सुशांत दोघांचाही मर्डर झाला आहे. यामागे कारण सांगितलं गेलं की, दिशा सालियनचा रिपोर्ट लपवण्यात आला आहे. आता दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.
दिशाचा मृत्यू ९ जून रोजी रात्री २ वाजताच्या आसपास झाला होता. पण पोस्टमार्टम दोन दिवसांनंतर ११ जूनला केलं गेलं होतं. पण प्रश्न हा उभा राहतो की, कोणत्या कारणाने बोरीवली पोस्टमार्टम सेंटरवर ऑटोप्सीला दोन दिवस उशीर लागला. ऑटोप्सीनुसार डोक्याला मार लागल्याने आणि अनेक प्रकारच्या अनैसर्गिक जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूच कारण तिला झालेल्या जखमा सांगितलं जात आहे. कारण ती १४व्या मजल्यावरून खाली पडली होती.
भाजपा खासदार नारायण राणे यांनी लावलेल्या आरोपांनुसार, दिशावर अत्याचार करण्यात आले होते. नंतर तिचा मर्डर करण्यात आला. पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून हे स्पष्ट होतं की, दिशा वरून खाली पडल्याने तिला अनेक जखमा झाल्या होत्या. तसेच तिच्यासोबत कोणत्याही प्रकारचा फिजिकल असॉल्ट केला गेला नाही.
पोस्टमार्टमध्ये मल्टीपल इंजरीजबाबत सांगण्यात आलं आहे. ज्या तिला १४ व्या मजल्यावरून खाली पडल्याने झाल्या होत्या. कुठेही प्रायव्हेट पार्ट इंजरीबाबत उल्लेख नाही. सोशल मीडियावर अनेक कॉन्सपायरेसी थेअरीज शेअर केल्या जात आहेत. ज्यात सांगण्यात येतं की, दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध सुशांतच्या मृत्यूशी आहे.
या थेअरीचं कारण हेही आहे की, दोघांचा मृत्यू एक आठवड्याच्या काळात झालाय. दिशाचा मृत्यू ९ जूनला तर सुशांतचा १४ जूनला झाला होता. मुंबई पोलिसांनुसार, दिशाने कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली होती. याचा सुशांतच्या केसशी काहीही संबंध नाही. भाजपा नेते नारायण राणे यांनी दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध सुशांतच्या मृत्यूशी असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी आरोप केला होता की, दिशासोबत आधी अत्याचार करण्यात आला नंतर तिला मारण्यात आलं.
दिशा संदर्भातील उलटसुलट चर्चांबाबत वडिलांचा खुलासा, मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र
सुशांतसिंहप्रकरणी सीबीआय चौकशीस महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम