देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका; दक्षिण मुंबईत पोलिसांची पहाटेपर्यंत छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 03:44 PM2019-05-25T15:44:49+5:302019-05-25T15:49:30+5:30
६ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली
मुंबई - दक्षिण मुंबईतील देहविक्रीसाठी ओळखला जाणारा कामाठीपुरा परिसरात मुंबई पोलिसांनी मोठी छापेमारी करत १०० हून अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दलालांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या. मध्यरात्री २ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही छापे मारून देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका केली आणि ६ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत कामाठीपुरा परिसरातील सिम्प्लेक्स इमारतीत छापेमारी करण्यात आली. अवैध देहविक्रीचा धंदा चालविणाऱ्या महिलांना आणि दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी लोकमतशी बोलताना सांगितली. सकाळपर्यंत ही कारवाई सुरु असल्याचं पुढे त्यांनी सांगितलं. आज अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले जाईल अशी पोलिसांनी माहिती दिली.
मुंबई - पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शखाली कामाठीपुरा परिसरातील मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत छापे; देहविक्री करणाऱ्या १०० हून अधिक महिलांची केली सुटका
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2019
(बातमीत वापरलेला फोटो प्रातिनिधिक आहे. घटनेशी संबंधित नाही.)