नागपुरात दुचाकीवरील स्टंटबाजीतून वाद; मध्यरात्री चौघांनी घेरले, तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:38 PM2021-05-24T20:38:09+5:302021-05-24T20:38:32+5:30

Crime news Nagpur: अनेक दिवसांपासून सुरू होती कुरबुर : चौघांना अटक पोलिसांनी रात्रीपासून धावपळ करून चारही आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Dispute over two-wheeler stunts in Nagpur; four people murder of a young man | नागपुरात दुचाकीवरील स्टंटबाजीतून वाद; मध्यरात्री चौघांनी घेरले, तरुणाचा खून

नागपुरात दुचाकीवरील स्टंटबाजीतून वाद; मध्यरात्री चौघांनी घेरले, तरुणाचा खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
 नागपूर : दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या दोन गटात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान रविवारी एका तरुणाच्या हत्येत झाले. सैफ अली उर्फ शाहरुख शौकत अली (वय २६) असे मृताचे नाव असून तो महाल मधील तुळशीबाग परिसरात रहात होता. त्याची हत्या करणारे आरोपी बाबल्या उर्फ लक्ष्मण दशरथ हिवराळे, विनायक इसकापे, आर. के. पटेल आणि बंटी जैस या चौघांना पोलिसांनी अटक केली.


 महाल आणि गणेशपेठ भागतील   काही तरुण विनाकारण वर्दळीच्या भागातून दुचाकी वेगात चालवून स्टंटबाजी करतात. आपल्या वस्तीत बाहेरचा कुणी स्टंटबाजी करत असेल तर दुसऱ्या टोळक्याचे तरुण त्याच्या वस्तीत जाऊन तशीच स्टंटबाजी करतात. यावरून दोन्ही गटांमध्ये वर्षभरापासून कुरबुरी सुरू आहेत. हाणामाऱ्या आणि वाहन तोड-फोडण्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आरोपी बाबल्या रविवारी रात्री ९ च्या सुमारास वेगात दुचाकी चालवत असल्यावरून त्याचा आदर्श समुद्रे सोबत वाद झाला. दोघांनीही त्यांच्या मित्रांना बोलवून घेतले. तेव्हा कसेबसे प्रकरण निपटले. त्यानंतर महाल परिसरात दबा धरून आरोपी बाबल्या आणि त्याचे साथीदार विरोधी गटातील तरुणांची  वाट पाहू लागले. रात्री १० वाजले तरी कुणी आले नसल्यामुळे ते आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री अकरा वाजता सैफ अली त्या भागात त्यांना एकटा आल्याचे कळले. त्यामुळे आरोपी बाबल्या, इसकापे, पटेल आणि बंटी हे चौघे त्याच्यावर धावून गेले. त्याला जबर मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी सैफ अली पळू लागला. मात्र आरोपींनी त्याला पकडून त्याच्या डोक्यात सिमेंटची फळी घातली. नंतर शस्त्राचे घाव घालून त्याला ठार मारले. 

प्रचंड तणाव
या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कोतवालीचे ठाणेदार भोसले, पोलीस उपायुक्त लोहित मतानी आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. सैफ अलीची हत्या झाल्याचे कळल्यानंतर त्याच्या गटातील साथीदार मोठ्या संख्येत त्या भागात चालून आले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोठा पोलीस ताफा या भागात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. सोमवारी दिवसभर या भागात प्रचंड तणावाचे वातावरण होते.

आरोपींना मंगळवारी न्यायालयात नेणार
  पोलिसांनी रात्रीपासून धावपळ करून चारही आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नाहक गेला जीव 
आरोपी बाबल्याची खुन्नस समुद्रे सोबत होती. सैफ अली हा समुद्रेचा मित्र असल्याने दोघांच्या वादात त्याचा नाहक जीव गेला. सैफच्या घरी पुढच्या महिन्यात विवाह समारंभ असल्याची चर्चा आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर तीव्र शोककळा पसरली आहे.

Web Title: Dispute over two-wheeler stunts in Nagpur; four people murder of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.