टीव्ही पाहण्यावरून वाद, लहान भावाने केला मोठ्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 02:27 PM2020-07-26T14:27:41+5:302020-07-26T14:28:01+5:30
टीव्हीच्या आवाजाने विश्रांतीत त्रास होत असल्याने या दोन भावांमध्ये वाद झाला.
यवतमाळ - क्षुल्लक कारणावरुन लहान भावाने मोठ्याचा वासल्याने वार करून खून केल्याची घटना पिंपळशेंडा ता. कळंब येथे शनिवारी रात्री घडली. सुरेश विठ्ठल गराट (३०) असे मृताचे नाव आहे. लहान भाऊ क्रिष्णा विठ्ठल गराट याने त्याचा खून केला.
क्रिष्णा विठ्ठल गराट हा रोजमजुरी करून घरी आला. त्यावेळी सुरेश गराट हा टीव्ही पाहत होता. टीव्हीच्या आवाजाने विश्रांतीत त्रास होत असल्याने या दोन भावांमध्ये वाद झाला. एवढेच नाही तर सुरेश हा क्रिष्णाच्या अंगावर धावून गेला. याच प्रकारातून क्रिष्णाने सुरेशच्या मानेवर सूतार कामाच्या वासल्याने घाव घातले.
या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी कळंब पोलिसांना दिली. ठाणेदार विजय राठोड, सहायक ठाणेदार राजू साळवे हे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणावरुन वासला, कपडे आदी साहित्य जप्त केले. झालेला घटनाक्रम क्रिष्णाने गावकºयांसमोर सांगितला. त्याला ताब्यात घेऊन सुरेशचा मृतदेत उत्तरीय तपासणीसाठी कळंब येथे रवाना करण्यात आला. या कुटुंबाचा सूतार काम हा जुना व्यवसाय आहे. त्यामुळे या कामाचे साहित्य घरात पडून होते.