क्षुल्लक कारणावरून पत्नीशी झाला वाद; भांडणाच्या रागातून वैज्ञानिक पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 04:51 AM2021-01-30T04:51:35+5:302021-01-30T04:51:47+5:30
बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने पत्नीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला
मुंबई : मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीमधील अनुज त्रिपाठी या ३७ वर्षीय वैज्ञानिक अधिकाऱ्याने आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणुशक्तीनगर येथील आकाशरत्न इमारतीत त्रिपाठी कुटुंबासह राहत हाेते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नी सरोजशी त्यांचे भांडण झाले. याच भांडणाच्या रागातून त्यांनी बेडरूममधील पंख्याला टॉवेलने गळफास घेतला.
बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने पत्नीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळेले. त्यांना तत्काळ बीएआरसीच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.