UP: वाद पेटला अन् घडले अग्नितांडव, दलित वस्ती दिली पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 14:59 IST2020-06-11T14:57:18+5:302020-06-11T14:59:52+5:30

योगी आदित्यनाथांनी आरोपींविरोधात एनएसए लावण्याचे दिले आदेश

Disputes erupted, fire broke out, Dalit settlements were set on fire | UP: वाद पेटला अन् घडले अग्नितांडव, दलित वस्ती दिली पेटवून

UP: वाद पेटला अन् घडले अग्नितांडव, दलित वस्ती दिली पेटवून

ठळक मुद्देमंगळवारी सराईकवाजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदेठी गावात दलितांची काही मुले शेळी चारत होती. त्याचवेळी दुसर्‍या समाजातील काही मुले आली. दोन्ही समाजातील मुलांमध्ये वादंग निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्या घरातील थोरांमध्ये देखील भांडणं सुरु झाली.

जौनपूर - उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात मुलांमधील वाद इतका पेटला की काही नराधमांनी अनेक दलितांची घरे जळाली. दलितांच्या वस्तीत त्यांनी खूप नुकसान केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस कारवाई करण्यात आली आणि ३५ जणांना अटक केली. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेत आरोपींविरूद्ध रासुका  (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी सराईकवाजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदेठी गावात दलितांची काही मुले शेळी चारत होती. त्याचवेळी दुसर्‍या समाजातील काही मुले आली. दोन्ही समाजातील मुलांमध्ये वादंग निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्या घरातील थोरांमध्ये देखील भांडणं सुरु झाली.

रात्री उशिरा लावली आग
दोन्ही समाजातील लोकांची बोलणी झाल्यानंतर हे प्रकरण मिटले. रात्री दुसऱ्या समाजातील लोकांनी  दलित कॉलनीत जाऊन कॉलनीला आग लावली. ज्यामुळे अनेक दलितांची घरे भस्मसात झाली. आपले प्राण वाचवण्यासाठी लोक घराबाहेर पडले, परंतु बरेच मुके प्राणी या आगीत जळाले. लोकांच्या संसाराची आगीत राखरांगोळी झाली .


 

35 जणांना अटक, अनेकांचा शोध
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत ३५ लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इतर आरोपींचा पोलीस  शोध घेण्यात येत आहे. लवकरच अन्य आरोपींना अटक केली जाईल. नूर आलम आणि जावेद सिद्दीकी असे या घटनेतील दोन मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यां आरोपींवर एनएसए आणि गँगस्टर कायदा लागू करण्याचे दिले आदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्याने आरोपींवर गँगस्टर अ‍ॅक्ट आणि एनएसएअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे स्थानिक एसएचओविरूद्ध दुर्लक्ष करण्याबाबत विभागीय कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्थिक नुकसान भरपाई जाहीर
मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबांचे नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10,26,450 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबांना 1-1 लाख रुपये समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत 7 पीडित कुटुंबांना घरे देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

 

Web Title: Disputes erupted, fire broke out, Dalit settlements were set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.