रंगाचा बेरंग, धुळवडीदरम्यान दोन गटात झाला राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:47 PM2020-03-10T15:47:02+5:302020-03-10T15:48:44+5:30
याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पुणे: धुळवडीच्या दिवशी गणेशखिंड रस्त्यावरील खैरेवाडीत युवकांच्या दोन गटात रंग लावण्याच्या कारणावरुन हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. टोळक्याकडून एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
रंग लावण्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाले. त्यानंतर एकमेकांना लाठी-काठ्याने मारहाण करण्यात आली. वसाहतीत धुळवड खेळताना वाद झाल्यानंतर दोन्ही गटातील युवकांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यामुळे परिसरात घबराट उडाली. वादात एका वाहनाची काच फुटली. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत दोन्ही गटातील युवक घटनास्थळावरुन पसार झाले.
याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, खैरेवाडीत झालेला वाद रंग लावण्याच्या कारणावरुन झाला. त्यामुळे दोन्ही गटातील युवकामध्ये मारामारी झाली.या घटनेनंतर पसार काहीजण पसार झाले. मारामारीत एका वाहनाची काच फुटली. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून मारामारी करणाºयांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
खैरेवाडीतील दोन गटातील मारामारी सीसीटीव्ही कॅमेºयांनी टिपली आहे. चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांकडून पळून गेलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. वादाचे अद्याप ठोस कारण समजले नसले तरी पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती या भागतील नागरिकांनी दिली.