भिवंडीत एमआयएमच्या जिल्हा अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 07:13 PM2020-09-25T19:13:26+5:302020-09-25T19:16:24+5:30

आज या अटक कारवाई दरम्यान दुपारपर्यंत भिवंडी न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.  

District president of MIM in Bhiwandi arrested for ransom | भिवंडीत एमआयएमच्या जिल्हा अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक

भिवंडीत एमआयएमच्या जिल्हा अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भा दं वि कलम 364अ, 386, 387, 34 आर्म कायदा 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक क्र.1 हे करीत आहेत. तर आरोपीच्या ताब्यातून  एक लाख  पंचवीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आभिवंडी शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडे काही दिवसापूर्वी खालिद गुड्डू व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली होती.

भिवंडी -  ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून भिवंडी एमआयएमच्या जिल्हा अध्यक्ष मोहम्मद खालिद मुख्तार अहमद शेख उर्फ खालिद गुड्डू यांच्यासह चार साथीदारांना एका बांधकाम व्यवसायिकाकडून एक लाख रुपये खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून खालिद गुड्डू याच्यासह त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया , फैज आलम, गुलाम खान या तिघांनाही पोलिसांनीअटक केली असून त्यांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने 2 ऑक्टोबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. तर आज या अटक कारवाई दरम्यान दुपारपर्यंत भिवंडी न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.  

           

भिवंडी शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडे काही दिवसापूर्वी खालिद गुड्डू व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी खालीद गुड्डू याचे भिवंडीतील समदनगर येथील बंगल्यात समोर रात्रीच्या सुमाराला सापळा रचला होता. त्यावेळी  आरोपी खालीद गुड्डू व त्याच्या साथीदारांना तक्रारदार यांचेकडून एक लाख रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भा दं वि कलम 364अ, 386, 387, 34 आर्म कायदा 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक क्र.1 हे करीत आहेत. तर आरोपीच्या ताब्यातून  एक लाख  पंचवीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
       

दरम्यान खालिद गुड्डू याच्यावर गुजरात , पुणे , अलिबाग व भिवंडी अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 23 गुन्हे नोंद असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. तर खालिद गुड्डू यांनी मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन एमआयएमच्या वतीने निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

 

Web Title: District president of MIM in Bhiwandi arrested for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.