भयंकर! राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:16 PM2021-02-10T16:16:57+5:302021-02-10T16:21:15+5:30

अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

district sanchalak of rss collecting donations for the Ram temple was shot | भयंकर! राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार

भयंकर! राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार

Next
ठळक मुद्देराम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्यावर गोळीबारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबारया प्रकरणी तीन जणांना अटक

कोटा : अयोध्येमध्ये बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी (Ram Mandir) देशभरात देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशवासींयांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र, राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (district sanchalak of rss collecting donations for the Ram temple was shot)

राजस्थानमधील कोटा येथे ही घटना घडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) जिल्हा संचालक दीप शाह राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र, काही जणांनी दीपक शाह यांना देणगी गोळा करण्यापासून रोखले. इशारा देऊनही दीपक शाह यांनी आपले काम सुरूच ठेवले. यानंतर शाह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

बाबा रामदेव यांना धक्का! पतंजलीला ठोठावला एक कोटींचा दंड

कोटा येथील रामगंज मंडी भागातील झालवाडामधून तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दीपक शाह यांना एमबीएस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारादरम्यान शाह यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या. ही घटना मध्यरात्री उशीरा घडली. 

दीपक शाह सायंकाळी ६ ते ७ वाजता राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघाले होते. यानंतर मध्यरात्री तीन जण दुचाकीवरून आले आणि दीपक शाह यांच्यावर गोळीबार सुरू केला. यामध्ये दीपक शाह जखमी झाले. दीपक शाह यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर या भागातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: district sanchalak of rss collecting donations for the Ram temple was shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.