नदीत ग्रॅनाईड आढळल्याने जिल्हा हादरला; दहशतवाद विरोधी पथक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:07 PM2021-05-17T16:07:27+5:302021-05-17T16:09:26+5:30
Karad Crime News : घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठा पोलिस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे.
कराड : कराड तालुक्यातील तांबवे गावानजीक असलेल्या कोयना नदीच्या पुलानजीक ग्रॅनाईड बॉम्ब सापडल्याने जिल्हा हादरला आहे, सोमवारी दुपारी मासेमारी करणार्या काही युवकांच्या जाळ्यात हे बॉम्ब सापडले. घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठा पोलिस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे.
कराड पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तांबवे गावानजीक कोयना नदीवर पूल आहे. या पुलानजीक सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही युवक मासेमारी करीत होते. त्यावेळी त्या युवकांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. युवकांनी तातडीने याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाने प्राथमिक पाहणी केली असता ते ग्रॅनाईड बॉम्ब असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबतची माहिती दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाकडून ग्रॅनाईडची तपासणी सुरू असून ते नदीपात्रात कोणी टाकले याचा शोध घेतला जात आहे.
चक्रीवादळात उरणच्या महिलेचा पहिला बळी https://t.co/L54xq8YVjw
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2021