आधी पतीला दिला घटस्फोट मग बनली सोनम, सासरी गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:42 AM2022-08-12T11:42:44+5:302022-08-12T11:43:01+5:30
Crime News : तरूणीच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवलं.
Crime News : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादच्या मुगलपुरा भागात एका विवाहित महिलेने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की, तरूणी मुस्लिम होती आणि तिने तिच्या पतीला तलाख दिल्यानंतर हिंदू तरूणासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. यानंतर महिलेने तिचं नाव बदललं होतं. तरूणीच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवलं.
मीडिया रिपोर्टनुसार, तरूणीने साधारण तीन महिन्यांआधी अजय दिवाकर नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर अजय दिवाकर आपली पत्नी सना उर्फ सोनमसोबत हिमगिरी कॉलनीतील आपल्या आत्याच्या घरात राहत होता. गुरूवारी तिचा मृतदेह घरात आढळून आला. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि तरूणीच्या कुटुंबियांची व सासरच्या लोकांची चौकशी करत आहेत.
याप्रकरणी सीओ सिव्हिल लाइन्स आशुतोष सिंह म्हणाले की, सना उर्फ सोनमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान जे काही पुरावे मिळतील त्यानुसार कारवाई केली जाईल. तेच तरूणीच्या कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलींना सासरच्या लोकांनी मारलं. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत आहेत.