घटस्फोटीत महिलेला मैत्रिणींनीच केलं किडनॅप, नंतर एका व्यक्तीला 70 हजारात विकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:03 PM2023-03-02T12:03:10+5:302023-03-02T12:03:26+5:30

Crime News : आरोप आहे की, तिन्ही मैत्रिणी तिला एका मिठाईच्या दुकानात घेऊन गेल्या. तिथे त्यांनी काही स्वीट डीश खाल्ल्या. त्यानंतर घरी परत आल्या. दुसऱ्या दिवशी तिला नोहनी गुरुद्वारामध्ये नेण्यात आलं.

Divorced woman made hostage by friends and sold for 70 thousand | घटस्फोटीत महिलेला मैत्रिणींनीच केलं किडनॅप, नंतर एका व्यक्तीला 70 हजारात विकलं

घटस्फोटीत महिलेला मैत्रिणींनीच केलं किडनॅप, नंतर एका व्यक्तीला 70 हजारात विकलं

googlenewsNext

Crime News : पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर वेगळी राहत असलेल्या बिलासपूरच्या 25 वर्षीय महिलेला मैत्रिणींनी किडनॅप केलं. आरोप आहे की, तिच्यावर जादूटोना करून तिला 70 हजार रूपयांमध्ये मोहन सिंह नावाच्या व्यक्तीला विकण्यात आलं. हे समजल्यावर ती तिथून कशीतरी पळाली आणि त्यानंतर पोलिसांना याबाबत सूचना दिली.

पोलीस अधिकारी जगदीश चंद्र यांनी सांगितलं की, ही घटना हरयाणाच्या मुलाना भागातील आहे. त्यांच्याकडे तक्रार आली होती. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितलं की, ती 15 दिवसांआधी अंबालाच्या मुलाना इथे आपली मैत्रीण कमलाकडे गेली होती. इथे आणखी दोन मैत्रिणी बबली आणि सविता आल्या.

आरोप आहे की, तिन्ही मैत्रिणी तिला एका मिठाईच्या दुकानात घेऊन गेल्या. तिथे त्यांनी काही स्वीट डीश खाल्ल्या. त्यानंतर घरी परत आल्या. दुसऱ्या दिवशी तिला नोहनी गुरुद्वारामध्ये नेण्यात आलं. जिथे तिचं नाव बदलण्यात आलं आणि मनप्रीत कौर असं ठेवलं. त्यानंतर एका हॉटेलमध्ये त्या जेवायला गेल्या.

त्यावेळी तिच्या जेवणात नशेचा पदार्थ टाकला. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा नोहनी येथील मोहन सिंहच्या घरात होती. तिचे कपडे काढलेले होते आणि तिच्यावर रेप करण्यात आला होता.

आरोप आहे की, मोहन सिंह यानेच तिच्यावर रेप केला होता. ज्यानंतर तिला जादूटोना करण्यासाठी एका मौलवीकडे नेण्यात आलं. आरोप आहे की, आरोपी मैत्रिणींनी 70 हजार रूपयात तिला मोहन सिंहच्या ताब्यात दिलं. ती कशीतरी तिथून बाहेर आली.

Web Title: Divorced woman made hostage by friends and sold for 70 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.