खळबळजनक! दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात मोठा खुलासा; हॉटेल मालकासह 3 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:03 PM2024-01-03T19:03:13+5:302024-01-03T19:05:13+5:30
Divya Pahuja Murder Case : दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
गुरुग्राममधील दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने अभिजीत, प्रकाश आणि इंद्रज या मारेकर्यांना अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेने हॉटेलचा मालक अभिजीत सिंह यालाही अटक केली आहे. याशिवाय प्रकाश आणि इंद्रज यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्रकाश आणि इंद्रज एका हॉटेलमध्ये काम करायचे. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली होती.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना
मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्रामच्या बलदेव नगरची रहिवासी होती. हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने साथीदारांना 10 लाख रुपये दिले. यानंतर मारेकरी अभिजीतच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या BMW DD03K240 कारच्या डिकीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गाडोली एन्काउंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. त्यामुळे तिच्या हत्येमागे गँगस्टर संदीप गाडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि गँगस्टरचा भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा हात असल्याचा आरोप दिव्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दिव्याच्या कुटुंबीयांनी सुदेश आणि ब्रह्मप्रकाश यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 जानेवारी रोजी रात्री उशीरा सेक्टर 14 पोलीस स्टेशन परिसरात घडली, जिथे पोलिसांना माहिती मिळाली की दिव्या पाहुजा नावाची एक 27 वर्षीय तरुणी, बलदेव नगर, गुरुग्राम येथे राहणारी आहे. दिल्लीतील व्यापारी आणि सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजीतसोबत फिरण्यासाठी ती बाहेर गेली होती.