काेणी क्यूआर काेड पाठविलाय, अजिबात स्कॅन करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 10:54 AM2021-08-07T10:54:00+5:302021-08-07T10:54:16+5:30

Cyber Crime : माेबाईलवर क्यूआर काेड पाठवून विविध आमिषे देण्यात येत आहेत.

Do not scan QR card at all | काेणी क्यूआर काेड पाठविलाय, अजिबात स्कॅन करू नका

काेणी क्यूआर काेड पाठविलाय, अजिबात स्कॅन करू नका

googlenewsNext

- सचिन राऊत

अकाेला : ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच कल माेठ्‌या प्रमाणात वाढला असून याचाच गैरफायदा घेण्याचा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे. तुमच्या माेबाईलवर क्यूआर काेड पाठवून विविध आमिषे देण्यात येत आहेत. तुम्ही क्यूआर काेड स्कॅन करताच तुमच्या खात्यातील रक्कम गायब हाेत असल्याच्याही घटना घडल्याने, सायबर पाेलिसांनी, काेणी क्यूआर काेड पाठविलाय, तर अजिबात स्कॅन करू नका, असे आवाहन केले आहे. तुम्ही आमिषाला बळी पडला, तर तुमची आर्थिक फसवणूक निश्चित आहे.

नाेटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गूगल पे, फाेन पे, क्यूआर काेड स्कॅन करून ऑनलाईन व्यवहार करणे, भीम ॲप यांसह विविध प्रकारे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांची संख्या सध्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काही बाबींची माहिती नसल्याने अनेकजण गूगलवर माहिती सर्च करतात. हेच हेरून सायबर चाेर संबंधित खातेदारास ऑनलाईन व्यवहाराची विविध आमिषे देऊन त्यांना क्यूआर काेड पाठवून त्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार सध्या जिल्ह्यात घडत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना तुमची फसवणूक झाल्यास किंवा खात्यातील रक्कम गायब झाल्यास तातडीने संबंधित पाेलीस स्टेशन किंवा सायबर पाेलिसांना माहिती दिल्यास रक्कम परतही आणण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारचे व्यवहार करताना काळजी घेण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

 

 

अशी हाेऊ शकते फसवणूक...

केस १

तुमच्या माेबाईलवर क्यूआर काेड पाठविण्यात येताे. तुम्ही क्यूआर काेडच्या माध्यमातून आजपर्यंत व्यवहार केलेला नसेल, तर व्यवहार केल्यास तुम्हाला रक्कम परत देण्याचे तसेच विविध गिफ्टचे आमिष देण्यात येते. त्यानंतर तुम्ही चुकूनही क्यूआर काेड स्कॅन केला, तर खात्यातील रक्कम पळविली जाते.

 

केस २

क्यूआर काेड स्कॅन करा व बक्षीस जिंका... अशा प्रकारची भुरळ पाडणारे मेसेज तुम्हाला येतील. तसेच अनाेळखी माेबाईल क्रमांकावरून तुम्हाला क्यूआर काेडही पाठविण्यात येईल. तुम्ही अशावेळी क्षणाचाही विलंब न करता ते स्कॅन करण्याऐवजी ताे क्यूआर काेड डीलिट करावा, जेणेकरून तुमची फसवणूक हाेणार नाही़

केस ३

गूगल पे व फाेन पेसह ऑनलाईन व्यवहार करताना क्यूआर काेड स्कॅन करताे. अशावेळी याेग्य ती काळजी घेऊनच आणखी संबंधित प्रतिष्ठानच्या संचालकांना दाखवूनच क्यूआर काेड स्कॅन करावा. खात्री पटल्यानंतरच क्यूआर काेड स्कॅन केल्यास तुुमची फसगत हाेणार नाही. मात्र खात्री न करता क्यूआर काेड स्कॅन केल्यास रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जाण्याचा धाेका आहे.

 

ही घ्या काळजी...

ऑनलाईन व्यवहार करताना किंवा काेणत्याही व्यवहाराच्यावेळी क्यूआर काेड स्कॅन करताना ताे क्यूआर काेड त्याच व्यक्तीच्या नावे आहे की नाही, याची खातरजमा करा़. कुणीही आमिष देऊन क्यूआर काेड पाठविला, तर ताे क्यूआर काेडचा फाेटाे तुमच्या माेबाईलमधून डीलिट करा.

विविध गिफ्ट किंवा पैसे परत देण्याचे आमिष असेल, तर अशावेळी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे क्यूआर काेड स्कॅन करून व्यवहार करताना याेग्य ती खबरदारी घ्या़.

Web Title: Do not scan QR card at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.