आम्हाला येडे समजताय का?; जितेंद्र आव्हाडांचा पोलीस अधिकाऱ्याला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 09:09 PM2019-11-24T21:09:07+5:302019-11-24T21:13:33+5:30

राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारावर पोलिसांची गुप्त पाळत; संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले, एवढा सिनिअर अधिकारी येऊन बसतो कसा ?

Do you knows us as mad? Jitendra Awhad questions the police officer | आम्हाला येडे समजताय का?; जितेंद्र आव्हाडांचा पोलीस अधिकाऱ्याला सवाल

आम्हाला येडे समजताय का?; जितेंद्र आव्हाडांचा पोलीस अधिकाऱ्याला सवाल

Next
ठळक मुद्दे एका कार्यकर्त्याने ही सर्व घटना मोबाईलमध्ये चित्रित करुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी अस्त्विात येत असतानाच भाजपाने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना फोडून सत्ता स्थापन केली. फुकट टाईमपास करायला, आम्हाला येड समजताय का?, अशी  विचारणा करत आव्हाडांनी त्यांना हॉटेलाच्य परिसरातून परत पाठविले.

मुंबई - राज्यातील राजकीय भुंकपामुळे सर्वस्तरावर खळबळ उडाली असताना विरोधी पक्षाच्या आमदारांच्या हालचालीवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेल रेनेसा येथे नजर ठेवून असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच आमदार जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची  खडाजंगी झाली. फुकट टाईमपास करायला, आम्हाला येड समजताय का?, अशी  विचारणा करत आव्हाडांनी त्यांना हॉटेलाच्य परिसरातून परत पाठविले. त्याबाबतच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. फडणवीस सरकार आमदारांना फोडण्यासाठी पोलिसांची मदत घेत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी अस्त्विात येत असतानाच भाजपाने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना फोडून सत्ता स्थापन केली. त्यांच्या या बंडाला शरद पवारांसह सर्व आमदार आणि शिवसेना, काँग्रेसने निषेध केल्याने पुन्हा सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला विश्वास दर्शक ठराव जिंकणे अशक्य बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आपले सर्व आमदार हॉटेल रेनेसॉवर ठेवले असून त्याठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी रविवारी दुपारी पोर्चमध्ये काही पोलीस बसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगितले. त्यांनी त्यांना विचारणा केली असता सुरवातीला ओळख लपविण्याचा प्रयत्न केला, त्यांना जाब विचारु लागल्यानंतर त्यांनी ओळखपत्रे दाखविली. ते पाहिल्यानंतर आव्हाड संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले, एवढा सिनिअर अधिकारी येऊन बसतो कसा? आम्हाला काय येडे समजतात का? काय तुमचे कामच काय इथे? अशी प्रश्नाची सरबत्ती केली. त्यानंतर संबंधित अधिकारी व अन्य साध्या वेशातील पोलीस तेथून निघून गेले. एका कार्यकर्त्याने ही सर्व घटना मोबाईलमध्ये चित्रित करुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आमदारांना फितविण्यासाठी भाजपा व फडणवीस सरकारकडून पोलिसांची मदत घेतली जात असल्याचे त्यातून दर्शविण्यात येत आहे.

Web Title: Do you knows us as mad? Jitendra Awhad questions the police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.