ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 05:42 PM2024-09-18T17:42:24+5:302024-09-18T17:42:56+5:30
आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला.
Doctor Trashed in Gujarat Hospital : गुजरातच्या भावनगरमधील एका खासगी रुग्णालयात तीन तरुणांनी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुममध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांनी तरुणांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले, यावर आरोपी संतापले आणि त्यांनी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 सप्टेंबर रोजी भावनगरच्या सिहोर शहरातील श्रेया हॉस्पिटलमध्ये घडली. तीन आरोपी तरुण रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी महिलेला भेटण्यासाठी आले होते. तिघेही रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात चप्पल घालून गेले. यावर डॉक्टर जयदीप सिंग गोहिल (वय 33) यांनी त्यांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितली. याचा राग येऊन तरुणांनी डॉक्टरांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण केली. या घटनेत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले आहेत.
Young Doctor assaulted at Sihor hospital in #Bhavnagar district;
— Indian Doctor🇮🇳 (@Indian__doctor) September 16, 2024
Altercation erupts over removing shoes.
A verbal altercation turned violent when relatives of a female patient were instructed to remove their footwear before entering the emergency ward."#MedTwitter@JPNaddapic.twitter.com/b91PU6eECD
आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला. ही संपूर्ण घटना वॉर्डमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी दाखल करण्यात केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींनी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी हिरेन डांगर, भावदीप डांगर आणि कौशिक कुवाडिया या तिघांविरोधात भादवी कलम 115 (2) (कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याच्या हेतूने कृत्ये), 352 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर कृत्य), 351 (3) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.