हनीट्रॅपमध्ये डॉक्टरला अडकवले, व्हॉट्सअॅपवर सेक्सी कॉल करून बनवला न्यूड व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 12:56 PM2021-06-09T12:56:15+5:302021-06-09T12:56:53+5:30
Crime News: डॉक्टरला फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून नंतर व्हॅट्सअॅपवर सेक्सी कॉल करून त्या डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नवी दिल्ली - एका डॉक्टरला फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून नंतर व्हॅट्सअॅपवर सेक्सी कॉल करून त्या डॉक्टरलाहनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रात्री ११ च्या सुमारास या डॉक्टरच्या फेसबूकवर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. डॉक्टरांनी ती एक्सेप्ट केली. मग समोरील मुलीच्या अकाऊंटवरून व्हॉट्सअॅप नंबरची मागणी केली गेली. दोघांमध्ये गप्पांना सुरुवात झाली. मग समोरील मुलीकडून सेक्सी व्हिडीओ कॉलचे आमिष दाखवले गेले. त्या मुलीने व्हिडीओ कॉल करून न्यूड होण्यास सुरुवात केली. मग डॉक्टरही न्यूड झाले. त्यानंतर मात्र त्वरित कॉल कट झाला. मग ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला. हे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन डॉक्टरकडून पैसे वसूल केले गेले. मात्र हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार थांबला नाही तेव्हा अखेर डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. मग पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.
दिल्लीतील या डॉक्टराने पोलिसांना सांगितले की, ते एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत. सध्या ते भाड्याच्या घरात राहत आहेत. मे महिन्यात त्यांना फेसबूकवर एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. या मुलीने व्हॉट्सअॅप नंबरची मागणी केली. मग १२ मे रोजी तिला या डॉक्टरांनी व्हॉट्सअॅप नंबर दिला. मग या मुलीने व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी पहिल्यांदा डॉक्टरांनी नकार दिला. मात्र पुन्हा असाच आग्रह झाल्यावर डॉक्टर तयार झाले. त्यावेळी मुलगी न्यूड झाली. मग डॉक्टरांनीही तसे केले. मात्र काही वेळातच त्यांना मेसेज आला की, त्यांचा न्यूड व्हिडीओ तयार झाला आहे. आता पैसे दिले नाहीत तर तुमचा व्हिडीओ व्हायरल केला जाईल.
मग डॉक्टरांनी त्या नंबरवर फोन केला असता एक तरुण बोलत होता. त्याने २९ हजार रुपये न दिल्यास न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या डॉक्टरांनी पैसे पाठवले. मग गर्ल चार्जच्या नावावर १६ हजार ८०० रुपये व्हिडीओ डिलीट करण्यासाठी २६ हजार ५०० आणि धमकी देऊन २९ हजार असे मिळून ८१ हजार ३०० रुपये डॉक्टरांकडून उकळले. मात्र तरीही ब्लॅकमेलरचे समाधान झाले नाही. त्याने सोशल मीडिया चार्जच्या नावाने ३७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. मग मात्र डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा या ब्लॅकमेलरने व्हिडीओ फेसबूक आणि यूट्युबवर अपलोड केल्याचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सुरुवात केली. त्याचा एक नंबर ब्लॉक केला असता दुसऱ्या नंबरवरून फोन करण्यास सुरुवात केली. अखेर डॉक्टरांनी हिंमत करून पोलिसांमध्ये तक्रार दिली.