डॉक्टरने गळफास लावून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये पत्नी, मेहुणीला धरले जबाबदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:05 AM2024-01-30T10:05:48+5:302024-01-30T10:06:28+5:30
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आत्महत्येपूर्वी डॉक्टर देवी दयाल यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एका ४० वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृत डॉक्टरची पत्नी, तिची बहीण आणि भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.डॉक्टर देवी दयाल यांनी शुक्रवारी आपल्या क्लिनिकमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आत्महत्येपूर्वी डॉक्टर देवी दयाल यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांना आपली पत्नी प्रिया यादव, मेहुणी भारती आणि मेहुणा राजू यांना जबाबदार धरले आहे. डॉक्टर देवी दयाल यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रिया यादव, मेहुणी भारती आणि मेहुणा राजू यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे प्रभारी राजेश सिंह यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नगर कोतवाली परिसरातील न्यू इंदिरा नगर कॉलनीत राहणाऱ्या डॉक्टर देवी दयाल यांनी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड केला होता. तसेच, सुसाईड नोटमध्ये पत्नी, मेहुणी भारती आणि मेहुणा राजू यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले होते.
डॉक्टर देवी दयाल यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, "जेव्हापासून पत्नी घरी आली तेव्हापासून ती माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर विविध आरोप करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिने माझा खूप मानसिक छळ केला. तिच्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे आणि मी वेडा झालो आहे. तिच्या संशयामुळे आणि न समजल्यामुळे मी आत्महत्या करत आहे."
डॉक्टर देवी दयाल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे वडील श्यामनाथ यादव यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी डॉक्टर देवी दयाल यांच्या पत्नी प्रिया यादव, मेहुणी भारती आणि मेहुणा राजू यांच्याविरुद्ध विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.