डॉक्टरने खजिन्यासाठी पत्नीचा खेळ केला खल्लास, ९ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:08 PM2021-10-25T14:08:57+5:302021-10-25T14:11:14+5:30
Karnataka Crime News : ही घटना ९ महिन्यांआधीची आहे. पोलिसांनी ४५ वर्षीय डॉ.चन्नकेशप्पाला अटक केली आहे. तो मारेश्वरा गावात मेडिकल प्रॅक्टिस करत होता.
Karnataka Crime News : कर्नाटक पोलिसांनी दावणगेरे जिल्ह्यात एका 'काळ्या जादू'शी संबंधित केसबाबत मोठा खुलासा केला आहे. औषधाचं एक हायडोज इंजेक्शन लावून आपल्या पत्नीची हत्या करण्याच्या आरोपात एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, ही घटना ९ महिन्यांआधीची आहे. पोलिसांनी ४५ वर्षीय डॉ.चन्नकेशप्पाला अटक केली आहे. तो मारेश्वरा गावात मेडिकल प्रॅक्टिस करत होता.
डॉक्टरची पत्नी शिल्पाच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी ११ फेब्रुवारीला दावणगेरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तक्रारीत मृत महिलेच्या आई-वडिलांनी दावा केला होता की, त्यांच्या मुलीचा मृत्यू अपघात नाही, तर प्लॅन केलेला एक मर्डर होता. सुरूवातीच्या चौकशी दरम्यान डॉक्टर आपली पत्नी ब्लड प्रेशरने पीडित असल्याचा दावा करत अटक होण्यापासून वाचण्यात यशस्वी ठरला.
काळी जादू करणाऱ्यांच्या संपर्कात
पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या पुढील चौकशीतून समोर आलं की, चन्नकेशप्पा गेल्या एक वर्षापासून नेहमीच काळी जादू करणाऱ्या लोकांकडे जात होता. यादरम्यान त्याला सल्ला देण्यात आला होता की, जर त्याला खजिना मिळवायचा असेल तर आपल्या पत्नीचा बळी द्यावा लागेल. पोलिसांनी सांगितलं की, ११ फेब्रुवारीला चन्नकेशप्पाने शिल्पाला डेक्सामेथासोनचा एक हेवी डोस दिला होता. ज्यानंतर ती आजारी पडली आणि हॉस्पिटलमध्ये नेताना तिचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'आम्ही डॉक्टर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरी द्वारे औषध देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर १८ ऑक्टोबरला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं होतं. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.