CoronaVirus डॉक्टर कोरोनाविरोधातील लढाई हरला; मृतदेह दफन करण्यास जमावाने विरोध केला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:21 PM2020-04-20T14:21:25+5:302020-04-20T15:27:16+5:30
चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे शव दफन करण्यास विरोध करण्यात आला आहे.
देशामध्ये अदृष्य अशा कोरोना व्हायरसविरोधात लढाई सुरु झाली आहे. मात्र, कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आणखी एक लढाई समाजातील उपद्रवी शक्तींविरोधात लढावी लागत आहे. त्यांना मारहाण, अश्लिल टीका झेलावी लागत आहे. हा त्रास मेल्यानंतरही संपलेला नसल्याचे तामिळनाडूमध्ये घडले आहे.
चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे शव दफन करण्यास विरोध करण्यात आला आहे. असाच प्रकार एका डॉक्टरसोबत घडला आहे.
चेन्नईमध्ये आज सकाळी एका डॉक्टरचा मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक एका दफनभूमीमध्ये आले होते. या ५५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यांना पाहून तिथे ५० जणांचा जमाव गोळा झाला. त्यांनी डॉक्टरचे शव ठेवलेल्या रुग्णवाहिकेवर हल्ला केला. महत्वाचे म्हणजे तिथे पोलिसही उपस्थित होते. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने जमाव पोलिसांवर भारी पडू लागला.
जमावाला नियंत्रणात आणू न शकल्याचे पाहून पोलिसांनी डॉक्टरच्या नातेवाईकांना मृतदेह दुसऱ्या ठिकाणी दफन करण्याची विनंती केली. यानंतर या डॉक्टरवर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन, हत्यारांद्वारे हल्ला करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखणे आदी गुन्हे दाखल केले आहेत.
Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापला
CoronaVirus खूशखबर! कोरोनाच्या 'मंदी'तही बंपर भरती; २ लाख नोकऱ्यांची संधी
CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर
चीनची 'कोरोना'आडून मोठी चाल; मोदी सरकारने उधळल्याने HDFC बँक वाचली