बॉयफ्रेंडनं Instagram वर प्रायव्हेट फोटो अपलोड केला; गर्लफ्रेंडनं घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:15 PM2022-09-21T12:15:37+5:302022-09-21T12:15:49+5:30
डॉक्टर विकास यूक्रेनहून परतल्यानंतर एका खासगी रुग्णालयात काम करत होता. हत्येतील आरोपी युवतीसोबत तो लिव्ह इनमध्ये राहत होता.
बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे सोशल मीडियावर अश्लिल फोटो पोस्ट केल्यामुळे संतापलेल्या युवतीनं तिच्या लिव्ह इन पार्टनरचा भयंकर बदला घेतला आहे. मित्रांसोबत मिळून युवतीने तिच्यासोबत राहणाऱ्या विकासची हत्या केली आहे. ज्या युवकाची हत्या झाली तो व्यवसायाने डॉक्टर होता. तर आरोपी युवती ही आर्किटेक्ट आहे.
डॉक्टर विकास आणि लिव्ह इन पार्टनर युवतीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी वाद झाला होता. काही दिवसांनी हे दोघं लग्न बंधनांत अडकणार होते. परंतु त्याआधीच युवतीने युवकाचा काटा काढला. मिळालेल्या माहितीनुसार, युवती आणि तिच्या आईचा न्यूड फोटो कुणीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर अपलोड केला होता. त्याचसोबत इतर मित्रांनाही पाठवला होता.
युवतीने जेव्हा या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा तिच्यासोबत लिव्ह इन म्हणून राहणाऱ्या विकासनेच बनावट खाते बनवून ते फोटो अपलोड केल्याचं उघड झाले. १० दिवसांपूर्वी युवती आणि विकासमध्ये या प्रकारावरून वाद झाला होता. त्यानंतर युवतीने तिच्या अन्य ३ मित्रांना बोलावून विकासचा काटा काढण्यासाठी प्लॅन बनवला. युवतीने तिच्या मित्रांना घरी बोलावलं आणि अश्लिल फोटोवरून चौघांनी विकासला मारहाण करण्यास सुरुवात केली. मॉब आणि बॉटलनं विकासला मारण्यात आले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असता तो कोमात गेल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. त्यानंतर १४ सप्टेंबरला विकासचा मृत्यू झाला. विकासच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. तो चेन्नईचा रहिवासी होता.
डॉक्टर विकास यूक्रेनहून परतल्यानंतर एका खासगी रुग्णालयात काम करत होता. हत्येतील आरोपी युवतीसोबत तो लिव्ह इनमध्ये राहत होता. दोघांच्या कुटुंबाना याबाबत माहिती होती. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी युवतीसह तिच्या २ सहकारी मित्रांना अटक केली आहे. तर अन्य १ जण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.