गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:31 AM2021-03-26T06:31:58+5:302021-03-26T06:32:18+5:30

अडीच कोटींची लूट, नागपाड़ा पोलिसांनी  याप्रकरणी सय्यद युसुफजमाल षमविल (४७) विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. वरळी परिसरात तक्रारदार ४१ वर्षीय डॉक्टर नेहा (नावात बदल)  राहण्यास आहेत

Doctor rapes woman with narcotic juice; Threatening to make the video viral | गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

googlenewsNext

मनीषा म्हात्रे

मुंबई : मुलगा आजारी असल्याचे सांगून डॉक्टर महिलेला घरी बोलावले. आणि गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता बलात्काराचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गेल्या सहा वर्षात मर्सिडीजसह तीन कार, १४० तोळे सोने आणि अडीच कोटी उकळल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात उघड़कीस आला आहे. 

नागपाड़ा पोलिसांनी  याप्रकरणी सय्यद युसुफजमाल षमविल (४७) विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. वरळी परिसरात तक्रारदार ४१ वर्षीय डॉक्टर नेहा (नावात बदल)  राहण्यास आहेत.  २०१४ मध्ये पतीविरुद्ध सुरू असलेल्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात ये-जा करत असताना, त्यांची सय्यदसोबत ओळख झाली. सय्यद हा नागपाडा येथील डिमटीकर रोड परिसरात राहण्यास आहेत. याच ओळखीतून २०१४ मध्ये सय्यदने मुलाची तब्येत ठीक नसल्याचे सांगून नेहाला घरी बोलावले. ज्यूसमधून गुंगीचे औषध देत त्यांच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्या तेव्हा, याचे व्हिडीओ, फ़ोटो काढून ते सोशल मीडियासह नातेवाइकांकडे व्हायरल करण्याची धमकी देत पैसे, दागिन्यांची मागणी सुरू केली. अशात महिलेने याबाबत बहिणीला सांगताच तिच्याकडूनही पैसे उकळण्यास सुरुवात झाली. 

२०१४ ते एप्रिल २०२० पर्यंत सय्यदने नेहाकड़ून ४० तोळे सोने आणि दीड कोटी रुपये उकळले. तर  त्यांच्या बहिणीकडून १०० तोळे सोने, १ कोटी रुपये तसेच त्यांच्या ३ गाड्या बळजबरीने ताब्यात घेतल्या. अशात, वेळोवेळी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नेहाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अशात सय्यदच्या वाढत्या अपेक्षांमुळे त्यांनी २१ मार्च रोजी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली.  महिलेच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी बलात्कार, खंडणी, धमकावणे या कलमाअंतर्गत सय्यदविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

आरोपीचा शोध सुरु
डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपीच्या घरी जावून आले आहेत. मात्र घरावरही बँकेची जप्ती आल्यामुळे तो तेथे मिळून आला नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर यांनी दिली आहे. 

मर्सिडीजवरही हात साफ
सय्यदने तक्रारदार यांच्या बहिणीची मर्सिडीज कारसह दोन शेवरलेट वाहनांवरही डल्ला मारला आहे. 

Web Title: Doctor rapes woman with narcotic juice; Threatening to make the video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस